उत्तर प्रदेशात घरीच उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्ण पिता-पुत्रांचा मृत्यू , वृद्ध पत्नी गंभीर

लखनऊ : २ मे – उत्तर प्रदेशात कोरोना विषाणूंच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यूच्या आकडेवारीमुळे राजधानी लखनऊमधील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लखनऊच्या स्मशानभूमीत असलेल्या लांबच लांब रांगांमुळे सरकारी आकडेवारीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकांना उपचार न मिळाल्यामुळे ते घरीच आपला जीव गमावत आहेत
ताज्या घटनेनुसार, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या कृष्णा नगर पोलीस ठाण्याची आहे. कृष्णा नगरच्या एलडीए कॉलनीच्या सेक्टर सी -1 मधील एका घरात होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या 65 वर्षीय पिता अरविंद गोयल आणि 25 वर्षीय मुलगा इलू गोयल यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा शेजार्यांना घरातून वास आला, तेव्हा कळालं की घरात मृत्यू झाली आहे. स्तब्ध शेजार्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस तिथे पोहोचल्यानंतर रहिवाशांनी बंदिस्त घराचं दार मोठा हातोडा मारुन तोडला. लोखंडी गेट उघडल्यानंतर आत दोन मृतदेह आढळले. तर 60 वर्षांची पत्नी रंजना गोयल खूपच गंभीर दिसत होत्या. त्यांची प्रकृतीही खूपच वाईट होती आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर तिघेही जण घरीच राहून उपचार घेत होते. अपंग असल्यामुळे महिला चालू शकत नव्हती. नवरा आणि मुलाच्या मृत्यूनंतर ती मोठ्याने ओरडली, पण तिचा आवाज घराबाहेर आला नाही. पोलिसांनी वडील-मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे, तर महिलेला उपचारासाठी लोकबंधू रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 दिवसांपूर्वी अरविंद गोयल हे घराच्या आत फिरताना दिसले होते, परंतु त्यानंतर ते दिसले नाहीत. कोरोनाच्या भीतीने, संपूर्ण परिसर ओसाड पडला आहे, ज्यामुळे कोणाचंही लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही. कृष्णनगरचे पोलीस निरीक्षक म्हणाले की, त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांविषयी कोणतीही माहिती नाही. अशा परिस्थितीत पोलिसांनी पिता आणि मुलाच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याचवेळी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply