न्यायालयाने फेटाळला नितेश राणे यांचा जामीन अर्ज

मुंबई : १ फेब्रुवारी – भाजप आमदार नितेश राणे यांना धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सोमवारी नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. आज, सत्र न्यायालयाने यावर निकाल दिला. जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नितेश राणे जिल्हा न्यायालयात दाद मागणार आहेत.
भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी काल (सोमवारी) पूर्ण झाली होती. आज सकाळीच नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परब यांना 4 फेब्रुवारी पर्यंतची न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकूपर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळला होता. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसंच नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असे निर्देश दिले होते. यासाठी कोर्टाने नितेश राणे यांना 10 दिवसांची मुदत दिली होती.

Leave a Reply