कानपूरमध्ये भीषण बस अपघातात ६ जणांचा मृत्यू

कानपुर : ३१ जानेवारी – उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरात रविवारी रात्री घंटाघर येथून टाट मिल कडे जाणाऱ्या एका अनियंत्रित इलेक्ट्रिक बसने अनेक गाड्यांना चिरडले. या बसच्या चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं होतं. रात्री साडेअकरा वाजता टाट मिल जवळ बसचा अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून आणखी काही लोक जखमी आहेत. अपघातानंतर बस चालक फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. बस चालकानं मद्यप्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमी व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. प्राथमिक तपासामध्ये या अपघातामध्ये ड्रायव्हरची चूक असल्याचं समोर आलंय. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज देखील शोधण्याचे काम सुरू आहे. सहा जणांपैकी तीन जणांची ओळख पटवण्यात यश आलं आहे.
कानपूरमध्ये बसने चिरडल्याने मोठा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. अपघातात सहा जणांचा मृत्यू नऊ जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. उत्तर प्रदेशच्या परिवहन बसने रिक्षा सह अनेक वाहनांना चिरडले. बस चालकाच्या हातातून बस अनियंत्रित झाल्याने मोठा अपघात घडला. सहापैकी तीन जणांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. बस चालकाने मद्यप्राशन केल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तर, जखमींवर उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply