शेजारी राहणाऱ्या निवृत्त जेलरची रिव्हाल्वर चोरून सुनेने सासूवर झाडली गोळी

यवतमाळ : २५ जानेवारी – सासू-सुनेचे विकोपाला जाणारे वाद काही नवीन नाही. मात्र असाच वादातून सुनने शेजारी राहणाऱ्या निवृत्त जेलरची रिव्हाल्वर चोरून सासुवर गोळी झाडली आहे. यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्ध सासूचा जागीच मृत्यू झाला आर्णी येथील प्रभाग क्रमांक दोन घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
आशा किसनराव पोझरवार (६८) असे या घटनेतील मृत सासुचे नाव आहे. तर, सासुवर बंदुकीतून गोळी झाडणाऱ्या सरोज अरविंद पोरजवार (२९) या सुनेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोजरवार कुटुंबीय अतिशय गरीब अवस्थेत वस्तीत राहतात मृत आशा व त्याचा मुलगा अरविंद भाजी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर त्यांचा दुसरा मुलगा गणेश एका दुकानात नोकर म्हणून काम करतो. परंतु सासू आशा आणि सरोज यांच्यात नेहमीच घरगुती कारणावरून कुरबुरी होत होत्या. यातून सुनेने वृद्ध सासुचा कायमचा गेम करण्याचा निर्णय घेतला.
पोरजवार यांच्या घरापुढे सेवा निवृत्त जेलर प्रभू गव्हाणकर राहतात. त्यांच्या घरातून २१ जानेवारी रोजी सरोजने त्यांची रिव्हॉल्वर चोरली. रिव्हाल्वर चोरीची आर्णी पोलिसात तक्रारही करण्यात आली होती. मात्र, ही रिव्हॉल्वर कोणाला सापडली नाही तर दुसरीकडे सरोजने सासूची हत्या करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत तब्बल चार दिवस रिव्हॉल्वर घरात लपून ठेवली.
सरोजने घरात दोघीच असल्याची संधी साधून आशा पोरजवार यांच्यावर पाठीमागून गोळी झाडली. त्यानंतर पुन्हा रिव्हॉल्वर लपवून ठेवली. मात्र सासू घरात पाय घसरून पडली प्रचंड जखमी झाल्याचा बनाव निर्माण केला. मात्र, काही वेळातच सासूचा मृत्यू झाला. प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्यावर गोळी लागल्यामुळे मृत्यू झाल्याचे पुढे आले.मात्र, ही गोळी नेमकी कोणी झाडली, ही बंदुक शेजारच्या निवृत्त जेलरचीच आहे का याचा उलगडा झाला नाही.
दरम्यान तातडीने आशा यांचा मृतदेह यवतमाळ येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनातुनही गोळी लागल्यामुळे मृत्यू झाल्याचे पुढे आले. त्यानंतर तातडीने पोलिस सरोज अरविंद पोरजवार तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. पोलीसी हिसका दाखवताच तिने खुनाची कबुली दिली.
सदर खुनाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पितांबर जाधव एपीआय शिवराज पवार, नागेश जायले,किशोर खंदार, वेंकटेश मच्छेवार, अमीत झेंडेकर,मनोज चव्हाण,मारुती मदने ,योगेश संकुलवार, मनोज चव्हाण ,मोहम्मद पप्पू वाले आदी करीत आहे
सकाळी आशा पोरजवार नेहमीप्रमाणे देवपूजा करीत होत्या त्याच वेळी भाजी व्यवसायातील अरुण नामक हमाल भाजी घेऊन त्यांच्या दारावर आला. मात्र, आधी पूजा करू दे नंतर भाजी मोजून णा असे आशा यांनी त्याला सांगितले. अरुण बाहेर थांबलेला असताना त्याच्या कानावर गोळी झाडल्याचा आवाज पडला. मात्र आवाज बंदुकीचा असावा याचा त्याला अंदाज आला नाही. नंतर दुपारी आशा यांच्या खुनाची चर्चा पसरताच अरुण हादरून गेला.
आशा पोरवार यांच्यावर गोळी झाडल्यानंतर सून सरोजने स्वयंपाकाच्या ओट्याखाली बंदूक लपवून ठेवली होती. ती स्वतः आशा यांच्या मृतदेहासह उत्तीर्ण तपासणीच्या निमित्ताने यवतमाळला गेली. तिकडे आर्णीमध्ये एसडीपीओ आदित्य मिरखेलकर ठाणेदार पितांबर जाधव यांनी पोरजवार व गव्हाणकर या दोन्ही कुटुंबांची घराची झडती सुरू केली. यवतमाळचे एलसीबी पथक झाले. शेवटी दुपारी पोरजवार यांच्या घरातच स्वयंपाकाच्या ओट्याखाली लपवलेली बंदूक पोलिसांना सापडली.

Leave a Reply