२४ तासात ३९२१ नवीन बाधित, शहरात ६ मृत्यू

नागपूर : २१ जानेवारी – नागपूर शहरासह पूर्व विदर्भात कोरोनाची तिसरी चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या लाटेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून रुग्णसंख्येत होणारी वाढ सतत सुरु आहे. शहरात मागील काही दिवसांपासून ४ हजारांच्या पुढे गेली रुग्णसंख्या आज काही प्रमाणत कमी झाली आहे. सोबतच शहरात आज ६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासात नागपूर जिल्ह्यात ३९२१ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
मागील काही दिवसांपासून शहरात सुरु झालेले निर्बंधही कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यात अयशस्वी ठरत आहेत. गेल्या २४ तासात शहरात ३९२१ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता ५३९०३६ वर पोहोचली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये १०१६ रुग्ण ग्रामीण भागातील, २८०८ शहरातील तर ९७ जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहेत. आज शहरात ६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, त्यातील सर्व मृत्यूंची शहरातच नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोना मृत्यूची संख्या आता १०१७७ वर पोहोचली आहे.
आज शहरात एकूण ८९३३ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील ८५२ चाचण्या ग्रामीण भागात तर ८०८१ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात २३८८ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५०१२१० वर पोहोचली आहे तर कोरोना मुक्तीचे प्रमाण ९२.९८ टक्क्यांवर गेले आहे. आज कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये ४०८ रुग्ण ग्रामीण भागातील, १९१९ शहरातील तर ६१ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. शहरात सध्या २७६४९ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यातील ६०९१ रुग्ण ग्रामीण भागातील तर २११११ शहरातील तर ४४७ जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहेत.

Leave a Reply