ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत – अतुल भातखळकर

मुंबई : २४ जानेवारी – बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आपले २५ वर्षे युतीत सडली, या मतावर मी ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र त्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांकडून उद्धव ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. त्यांनी ट्विट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. यांच्या बोगस बेगडी विचारधारेचे असे खंडीभर पुरावे देता येतील. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत.’ असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.
अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना एक ट्विट पोस्ट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका क्रीडासंकुलाची स्वागत कमान दिसत आहे. या कमानीवर विर टिपू सुलतान क्रीडासंकुलाचे काम पालकमंत्री अस्मल शेख यांच्या निधितून झाल्याचा उल्लेख आहे. या फोटोला भातखळकर यांनी एक कॅप्शन देखील दिले आहे. ‘ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. यांच्या बोगस बेगडी विचारधारेचे असे खंडीभर पुरावे देता येतील. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत.’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. आता भातखळकर यांच्या टीकेला शिवसेना काय उत्तर देणार हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
‘दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी पाहिलं, आपण दिल्ली काबीज करु’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची पुढील वाटचाल स्पष्ट केलीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आपले 25 वर्षे युतीत सडली, या मतावर मी ठाम आहे. याचं कारण राजकारण म्हणजे गजकरण असं बाळासाहेब म्हणायचे. यांना राजकारणाचं गजकरण झालं असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Leave a Reply