नागपुरात आढळले ओमिक्रॉनमध्ये म्युटेशन

नागपूर : २४ जानेवारी – राज्यावर कोरोनाचे संकट सुरु असतानाच ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनची रुग्ण संख्या वाढत आहे. नागपुरात ओमिक्रॉनमध्ये म्युटेशन आढळून आले आहेत. नागपुरात निरीच्या संशोधनातून ओमिक्रॉनमध्ये हे म्युटेशन आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे. निरीमध्ये चौथ्या टप्प्यातील ८९ नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले होते. यामधील ८९ नमुन्यांपैकी सर्व नमुन्यांची तपासणी केल्यानंतर त्यामधील सर्व नमुने ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
याबाबत निरीच्या शास्त्रज्ञानांना ओमिक्रॅान विषाणूतील बदल कशाप्रकारे प्रभाव टाकणार यावर विचारले असता त्याबाबत बोलण्यावर त्यांनी नकार दिला आहे.
नागपूरात चौथ्या टप्प्यात जे नमुने घेण्यात आले त्यातील ६६.२ टक्के नमुन्यांमध्ये ओमिक्रॉनचा बी-२ (बीए २) हा ही विषाणू आढळून आला आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनमध्ये बदल होत असल्याने आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने भीतीचे वातावरणही पसरले आहे.
नागपूरामध्ये ओमिक्रॉनमध्ये म्युटेशन दिसून आले असले तरी किंवा बी-२ हा विषाणू आढळून आला असला तरी ओमिक्रॉन विषाणूतील बदल कशाप्रकारे प्रभाव टाकणार आहे याबाबत मात्र निरीच्या शास्त्रज्ञांनी बोलण्यास नकार दिला आहे.

Leave a Reply