मेडिकलमधील ७६ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण

नागपूर : २३ जानेवारी – मेडिकल मधील निवासी डॉक्टरांनी प्रथम व द्वितीय लहरी मध्ये अनन्य साधारण कामगिरी बजावली. सम्पूर्ण नागपूर चा कोविड रुग्णांचा मेयो व मेडीकल येथील निवासी डॉक्टरांवरच आहे. कोविड ची तिसरी लहर ही सौम्य असून यातही निवासी डॉक्टर आपली कामगिरी पार पाडत रुग्ण सेवा देत आहे. रुग्णांना सेवा देत असताना अनेक निवासी डॉकटर नकळत कोविड ला बळी पडत आहेत. मेडिकल मध्ये गेल्या १० दिवसांपासून सुमारे ७६ विविध विभागाचे निवासी डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहेत. सर्व निवासी डॉक्टर हे सौम्य लक्षणे असणारे आहे. यातील २२ डॉक्टर बरे होऊन परत सेवे वर रूजू झाले आहेत. 2 डॉक्टर सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे व योग्य उपचार चालू आहे. ५२ डॉक्टर घरीच विलगीकरणात असून काही घरी व काही शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विलगिकरण व्यवस्थेत राहत आहे. रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी योग्य प्रकारे कोविड नियमांचे पालन केले तर डॉक्टरांना कोविड पासून वाचवण्यास मदत होईल व आपली आरोग्य यंत्रणा मजबुत करता येईल.

Leave a Reply