गोव्यात शिवसेनेने जाहीर केली ९ उमेदवारांची पहिली यादी, आदित्य ठाकरे करणार प्रचार

पणजी : २१ जानेवारी – गोव्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आज ९ उमेदवारांची यादी जाहीर करत धमाका केला आहे. शिवसेनेचे संजय राऊत यांनी पणजीत माहिती दिली. शिवसेना गोव्यात १० ते १२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे ) हे गोवा निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या नेृत्वात गोव्यात शिवसेना प्रचार करेल. गोव्यात प्रत्येक मतदारसंघ ताकदीने निवडणूक लाढणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आदित्य ठाकरेही मैदानात उतरणार आहेत. त्यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेतेही प्रचार करतील. कोणत्याही परिस्थितीत भाजपला गोव्यात पुन्हा सत्तेवर येऊ देणार नाही. असा निर्धार शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. तसंच गोव्यात आम्हाला मतदारांकडून प्रतिसाद मिळतो आहे, असंही राऊत म्हणाले.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकरांना भाजपने पणजीतून उमेदवारी नाकारली आहे. हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मनोहर पर्रीकरांचे पुत्र म्हणून तिकीट देणं योग्य नाही, ही घराणेशाही होईल, असं भाजपकडून म्हटलं जात आहे. मग उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांचा भाजप प्रवेश का केला गेला? घराणेशाही बघूनच ना. उत्पल पर्रीकरांना आम्ही पाठिंबा देऊ, जर ते स्वतंत्र निवडणूक लवढवत असतील तर. उत्पल पर्रीकरांसाठी इतर पक्षांचंही मन शिवसेनाकडून वळवण्याचा प्रयत्न करू. एवढचं काय तर त्यांच्यासाठी शिवसेना उमेदवार मागेही घेऊ शकते. पण सध्या शिवसेने शैलेंद्र वेलिंगकर यांना पणजीतून उमेदवारी दिलीय, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीचा जाहीरनामा लवकरच प्रकाशित केला जाईल. गोव्यातील स्थानिक आणि भूमिपूत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू. स्थानिकांचे प्रश्न, भ्रष्टाचार आणि राजकारणाची दंडेलशाही थांबवण्यासाठी शिवसेनेचा वाघ गोव्याच्या विधानसभेत असणं गरजेचं आहे. गोव्याची जनता आम्हाला नक्कीच संधी देईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Leave a Reply