सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

चंपा – देहाती औरत

महाराष्ट्राची राजनिती किती निकृष्ट आणि निम्नतम स्तराला पोचली आहे याचे छान से उदाहरण म्हणजे काकांनी, मेट्रो रेल्वेतून उभे राहून केलेली यात्रा. आणि त्यावर भाजपा ने केलेली निरर्थक पत्रकार परिषद. कामाच्या चाचण्या कंपनीच्या अखत्यारीत येतात. चाचण्यांमध्ये “ट्रायल रन” देखील समाविष्ट असतो.
राजकारणातले असामान्य व्यक्तिमत्व असलेले काका, जास्त बोलत नाहीत. शक्यतो चर्चेत न येता त्यांचा शांतपणे स्वार्थासाठी सर्व काही, ह्या उक्ति प्रमाणे त्यांचा उपद्व्याप सुरू असतो. जसे एकदा दारु, बार, रेस्टॉरंट साठी विजबिल, भाडेपट्टी, पाणि पट्टी जे काही आहे. ते माफ करण्याचे पत्र. असे म्हणतात की जेव्हा ते केंद्र सरकार मध्ये रक्षा मंत्री होते, तेव्हा आर्मी च्या अखत्यारीत असणाऱ्या जमिनी बळकावण्याचा प्रयास, आर्मीच्या ऑफिसरांनी हाणून पाडला. सांगण्याचे तात्पर्य काकांचे सर्व कार्यक्रम प्रायोजित असतात. लाळघोटी, विकाऊ, हलाल मिडिया त्यांची थुंकी झेलत असते. अर्थात थुंकी झेलत असते म्हणून मिडियाला “हलाल मिडिया” हे शब्दप्रयोजन. आणि मविआ सरकारची बिघडलेली प्रतिमा सुधरविण्यासाठी, मित्रपक्षांची गोची करून, विरोधी पक्षांना झोंबेल असे झणझणीत झोंबील लावून ते जनतेसमोर प्रसारीत करतात. गंमत म्हणजे मग आपापला पक्ष ठेवायला- वाचवायला सगळे पत्रकार परिषद घेवून, काकांवर तुटून पडतात. पण बोलताना शब्द मात्र,”काकांबद्दल आम्हाला आदरच् आहे” वगैरे वगैरे म्हणतात. ह्याला म्हणतात काकांचा धाक, काकांची दहशत. निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी काकांशी खाजविण्याचा प्रयत्न केला आणि काकांनी त्याचा,” मी पुन्हा येईन” चा नारा, हवेत विरवला. अन् देवेंद्र ला “विरोधी पक्षनेता” हे खरुज – माफ करा – बिरुद लावून परत आणला.
एवढी सगळी प्रस्तावना देण्याचे प्रयोजन एवढ्यासाठी की काकांनी, पुणे मेट्रो रेल्वे मध्ये, ट्रायल चे वेळी उभ्याने प्रवास केला. आणि बातम्यांचे पेव फुटले. आणि नेहमी प्रमाणे भाजपा चे प्रतिनिधी चंद्रकांत पाटील पण लगेच प्रतिक्रिया द्यायला सज्ज झाले. जसे एके जमान्यात पाकिस्तानी पंतप्रधानाने देहाती औरत म्हणून भारताच्या पंतप्रधानांची खिल्ली उडविली होती. त्याची आठवण झाली. युएन मध्ये त्यांनी आपल्या पंतप्रधानांवर अशी टिप्पणी एवढ्यासाठी केली की मनमोहनसिंग छोटे छोटे मुद्दे पाकिस्तानाबद्दलचे, युएन ला नेतो. पाकिस्तानचे गा-हाणे करतो. त्याचप्रमाणे मग अजित पवारांनी त्यांना “चंपा” चंद्रकांत पाटील चा शॉर्ट फॉर्म केला, त्याची आठवण होते. काही फालतू गोष्टींवर पत्रकार परिषद घ्यायची आणि आपली पाठ थोपटून घ्यायची.
तर अशा चंद्रकांत पाटलांनी लगेच पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत त्यांचा सूर असा होता की अशी घाईघाईने ट्रायल घेण्याची गरज काय होती? ११००० कोटी रुपयांच्या प्रोजेक्ट मध्ये ८००० कोटी केंद्र सरकार देते इतर माध्यमांनी आणिक येणारा पैसा आणि राज्य सरकार इंच भर पैसा लावते – फूटभर पैसा केंद्र सरकार लावते. आणि एका ट्रायल रन मध्ये काका उभ्याने प्रवास करतात आणि आमच्या काळात सर्व कामे केलीत, सर्व संस्थांकडून अनुमोदनाचे, परवानगीचे कागदपत्र जमा केलीत. केंद्राकडून निधी उभारला, राज्य सरकार कडून निधी चे संकलन केले आणि आता प्रोजेक्ट पुर्णत्वास आला तर संपूर्ण प्रोजेक्ट चे श्रेय लाटण्याचे कार्य माननीय शरद पवार करताहेत असा सूर. बरोब्बर “चंपा” देहाती औरत. यांचा!
बरे! पत्रकार परिषदेत सुरुवात कशी करावी? पन्नास वर्षे राजकीय कारकीर्द असणारे, आदरणीय शरद पवार!
बाप्प्या हा माणूस तुला आदरणीय आहे तर तू त्याच्या नावाने का कोकलतोय? का तुझी चड्डी उसवतेय खरं बोलताना. आमचा मराठा रांगडा गडी चक्क बाईवानी तक्रारीच्या सुरात, ज्याची तक्रार करायची आहे त्यालाच आदरणीय म्हणतो आहे. गंमत आहे – “चंपा – देहाती औरत”
चंद्रकांत साहेब ही जी ताबडतोब घटना घडल्या घडल्या तुम्ही जी पत्रकार परिषद घेतली ना! बस्स! काकांनी तुम्हाला फ्लाईटेड गुगली टाकली, क्रिजमधून बाहेर काढला आणि तुम्हाला क्रिज आऊट केले. तुम्हाला कळले देखील नाही. काका काय तुम्हाला सामान्य व्यक्तिमत्त्व वाटले? असामान्य व्यक्तिमत्व असलेले काका आहेत. तुम्ही त्यांच्या वाटेला जाल तर तुमची कशी वाट लागेल, कळणार नाही! पाटील साहेब तुम्हाला.
ज्यावेळी माहिती आहे की हे उद्घाटन नसून ट्रायल घेतल्या गेली. तर एवढा त्याविरोधात पत्रकार परिषद घेऊन, ट्रायल रन सारख्या कार्याप्रसंगी उभ्याने प्रवास केल्याची, विरोधी पक्षाने दखल घेतली, पत्रकार परिषद घेतली. ह्या मध्ये शरद पवारांचे इप्सित साध्य झाले म्हणायला हरकत नाही. काकांच्या बॉल ला टोलवायच्या नादात क्रिज आऊट झालात. आणि देहाती औरत सारखे परत परत एक काकांबद्दलचा कांगावा पत्रकार परिषदेत केला की श्रेय लाटले वगैरे वगैरे आणि आपोआप अशा वेळी हवी ती प्रसिद्धी प्रसार माध्यमांद्वारे सर्वत्र बहाल झाली. ह्यात तुम्ही काय जिंकले?
अरे! राज्य सरकार त्यांचे. जे करताहेत करू दे ना! तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीत आमचे सरकार असते तर आम्ही याला बोलावला असता, त्याला बोलावला असता, खालच्याला बोलावणे धाडले असते, वरच्याला वर धाडले असते, खालच्याच्या खालच्याला खाली धाडले असते आणि मग सर्व आमंत्रितांदेखत, सर्वांना सर्वांचा मान देत, सर्वांचा मान राखत, सर्वांचे श्रेय सर्वांना वाटत, नितीमत्तेची कास धरत आम्ही “मेट्रो ट्रायल सोहळा” साजरा केला असता. पुंगळ्या करा त्या नितिमत्तेच्या आणि कुठे घालायच्या! विचार करा आणि तिथे तिथे घाला. विरोधी पक्षात आहात. भरपूर वेळ आहे. ईथे तिथे घाला. “चंपा – देहाती औरत” अरे, राजाभौ, ज्या सरकारची निर्मिती मुळी विश्वासघातावर झाली आहे. ज्याचा मुख्यमंत्री घरात बसतो, उपमुख्यमंत्री स्वतः ला चालक समजतो, सुत्रधाराची सुत्रे शरद पवार सांभाळतात. त्यांच्या कडून कुठल्या निती आणि अनिती ची अपेक्षा करताय. आणि मविआ कडून निती ची अपेक्षा करताय तर मग तुमची राजकारणातली इतकी सारी वर्षे फुकट गेली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला त्याच्या किल्ल्यात जाऊन मारायचा प्रयत्न केला होता तद्वतच काकांनी राजकारणाच्या तुमच्या किल्ल्यात शिरून, मान्यवर अमित शहांच्या भाषेत सांगायचे तर ,”हमारा पुरा अस्तबल चोरी किया!” अरे! तुमच्या बुडाखालुन मुख्यमंत्री पदाची खुर्ची ओरबाडून घेतली, तुम्ही समजू नाही शकला की खरा शत्रू हा तुमचा मित्रपक्ष आहे. तुमच्या नाकावर टिच्चून तुमचा (भाजपाचा)पिछवाडा मुख्यमंत्री पदावर बसायला अनाथ केला. ही वल्गना तुमची नाही तर तुमच्या युतीवर विश्वास ठेवून नागरिकांनी तुमच्या युतीला जे मतदान केले आणि मताधिक्यात वरचढ असुन राजकारणात तुम्ही कमी पडलात. इथे तुम्ही मतदारांची वल्गना केली. मतदारांचा मान चंपा – देहाती औरत, तुला राखता आला नाही. आणि आता रोज रोज पत्रकार परिषद घेऊन बायांसारखी चहाड्या करणारी पत्रकार परिषद घेताय कसली. भाजपाच्या रोजच्या निरर्थक पत्रकार परिषदांचा वीट आलाय. निष्पन्न काही होत नाही आणि महाराष्ट्रात टिकाव धरायला, फुकटाच्या पत्रकार परिषदा.
पाटील भौ, रागात भर पडली नी हा लेख लिहीणं एवढ्यासाठी बाध्य झालं की तुम्ही स्वतः सांगितले की ह्याचे उद्घाटन माननीय प्रधानमंत्री मोदींचे हस्ते कोरोना कालमुळे काहीकाळ लांबला. त्याआधी राज्य सरकार ला करू दे ना काहीही! तुम्ही कशाला पत्रकार परिषदा घेवून त्यांच्या मेट्रो ट्रायलचं फुटेज वाढवताय आणि तुम्हाला असहनीय शरद पवारांच वेटेज वाढवताय? पण जेव्हा तुम्ही म्हणताय की मेट्रो कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारचा प्रचंड तणाव आहे. आणि तणावाखाली ही ट्रायल घेतल्या गेली. आणि सर्वपक्षांना एकत्रित न घेता ट्रायल रन फक्त आणि फक्त प्रोजेक्ट चे क्रेडिट घेण्यासाठी केले म्हणून तुम्ही” मेट्रोकंपनीवर हक्क भंगाची कारवाई करा”. किंवा प्रस्ताव आणा. शरद पवारांवर मी कारवाई करणार नाही.
अरे चंद्रकांत राया, एकीकडे म्हणायचे की राज्यात कर्मचारी प्रचंड दबावाखाली कामं करताहेत. अशा विचित्र पद्धतीने राज्य सरकार काम करते आहे. आणि दुसरीकडे म्हणायचे की मी शरद पवारांवर ट्रायल रन ची कारवाई करणार नाही तर मेट्रो कंपनी वर करीन. म्हणजे “चोर सोडून संन्याशाला फाशी” की राव चंपासेठ.
आता काय मेट्रो कंपनीचा मालक अक्षता,सुपारी डब्यात घालून शरद पवारांना काय आवतन द्यायला गेला होता, डोक्यावर टोपी घालून की साहेब ट्रायल रन साठी यायचं बरं का! डब्यात तुम्हाला उभं -हायला मजबूत आडवा दांडा घालून ठिवलाय बरं का! हातानं धरायला! मग पवार साहेबांनी त्याच्या डब्यातल्या अक्षता घेतल्या, घरातील सुपारी त्याच्या डब्यात टाकली असेल आणि नक्की येतो बरं का! आवतनाची निश्चिती करुन मेट्रो कंपनीच्या मालकाला परत पाठविले असेल!!!! म्हणून ह्या लेखाचे नाव देखील “चंपा – एक देहाती औरत” ठेवणे भाग पडले.
मेट्रो ट्रायल रन मध्ये शरद पवारांची उपस्थिती हा राजकीय घडामोडींचा मुद्दा. त्यामध्ये मग हक्क भंगाचा प्रस्ताव मेट्रो कंपनीवर का टाकताय? जर शरद पवार स्वजातीने मोदींच्या दौऱ्यासाठी देखरेख करण्यास गेले असतील तर ? मोदी उद्घाटनाला येणार म्हटल्यानंतर काही पण कारणं असु शकतात. पंजाब प्रकरण ताजे आहे. त्यावर तोडगा किंवा दुसरा अजुन एक चान्स! भिन्न भिन्न लोकांच्या भिन्न भिन्न विचार प्रणाली. साहेब, ट्रायल साठी का गेले? हे त्यांनाच् माहिती.
पण मुळ मुद्दा असा की पाटील साहेब, हक्क भंगाचा प्रस्ताव मेट्रो कंपनीवर का? शरद पवारांवर का नाही? हा सरळ सरळ चुकीचा आरोप मेट्रोवर करताहात. बाईने रोंटी गेम खेळण्यासारखे करताहात. अरे! हिंमत आहे तर सरळ सरळ शरद पवारांवर केस करा नं. तर समजू भाजपा च्या गड्यात मर्द मराठा दम आहे. सत्याला टक्कर देण्याची हिंमत आहे, लोकांना शिकवलेली नितीमत्ता पाटलांच्या रक्तारक्तात भिनलेली आहे.
तुम्ही जर मेट्रो कंपनीवर हक्क भंगाचा प्रस्ताव आणला तर !!! कुठल्याही परिस्थितीत ही केस तुम्ही कोर्टात हारणार हे निश्चित. कारण मेट्रो अधिकृतरित्या लोकार्पण करण्याअगोदर सर्व चाचण्या ह्या कंपनीच्या अखत्यारीत असतात, चाचण्यांचे सर्व हक्क कंपनीकडे असतात. तुम्ही उगाच टिमगी वाजवताय, पत्रकार परिषदेत. म्हणून म्हणतोय पण मेट्रो कंपनीवर प्रस्ताव आणला तर समजायचे की हे “संन्याशाला फाशी” वर चढवायची तयारी करताहेत आणि हे लक्षण “चंपा – देहाती औरत” चे आहे.

भाई देवघरे

Leave a Reply