आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते एन. एल. नाईक यांचे निधन

नागपूर : १६ जानेवारी – आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते एन.एल. नाईक यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे एक मुलगा चार मुली, जावई, नातवंड व मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी त्यांच्या विवेकानंद नगर येथी निवासस्थानावरून निघून सहकार घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नामांतर आंदोलनासह अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते चळवळीत सक्रिय होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी चे सदस्य भदंत नाग दिपणकार स्थाविर यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा पार पडली. याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर मानके, माजी आमदार प्रकाश गजभिये, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक प्रकाश बोंदाडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते राजुभाऊ लोखंडे, भारतीय दलित पँथरच्या प्रकाश बन्सोड, रिपाइंचे नेते राजन वाघमारे, रिपब्लिकन मूव्हमेंटचे नरेश वाहणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply