बरे होण्याचे प्रमाण वाढले, शहरात ६४६१ बाधित तर ७२९४ कोरोनामुक्त, ८८ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : ३० एप्रिल – नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहेत. मृत्युसंख्याही वाढतेच आहे. परंतु गेल्या काही दिवसात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढलेली दिसत आहे. यामुळे थोडे दिलासादायक वातावरण नक्कीच निर्माण होण्यास मदत होणार आहे. आज पूर्व विदर्भात ११२६८ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून १११३९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर पूर्व विदर्भात आज १६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर शहरात आज कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या बाधितांपेक्षा जास्त आढळून आली शहरात आज ६४६१ नवीन बी अधिक रुग्ण आढळून आले तर ७२९४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर शहरात आज ८८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
मागील काही दिवसात नागपूर शहरात दिलासादायक रुग्ण बरे होत असले तरीही नवीन बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसात शहरात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही बाधितांपेक्षा जास्त दिसून आली आहे. आज शहरात ६४६१ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून त्यात २८०२ ग्रामीण भागातील ३६४९ शहरातील तर इतर जिल्ह्यातील १० रुग्णांचा समावेश आहे. एकूण रुग्णसंख्या ४०७७८७ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात नागपुरात ८८ रुग्णांचा मृत्यू झाला असून ग्रामीण व शहरी भागात सारखेच म्हणजे ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर १० इतर जिल्ह्यातील रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतकांची संख्या ७३८८ वर पोहोचली आहे.
शहरात आज २२८७६ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात ४५९१ ग्रामीण भागात तर १८२८५ चाचण्या शहरात घेण्यात आल्या. गेल्या २४ तासात शहरात ७२९४ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३२३६९३ वर पोहोचली आहे तर कोरोना बरे होण्याचे प्रमाण ७९.३८ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या शहरात ७६७०६ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यात ३१७९३ ग्रामीण भागात तर ४४९१३ शहरातील रुग्ण आहेत.

Leave a Reply