चंद्रपुरात पकडली २९ लाख रुपयांची चोरटी दारू

चंद्रपूर : ३० एप्रिल – लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी खांबाडा चेक पोस्टवर सापळा रचून दारू तस्करांकडून देशी दारू, बेली मिनरल्स पाणी बाटल्यांसह २९ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत चार आरोपींना जेरबंद केले आहे.
जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे चढय़ा भावाने दारू विक्री करण्यासाठी पोलिसांची नजर चुकवून देशी- विदेशी दारूची चोरट्या पद्धतीने तस्करी मागील अनेक वर्षांपासून निरंतर सुरू आहे. पोलिस हवालदार प्रदीप पाटील दुपारी कार्यालयीन कामाकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात असताना, नागपूर वरून मालवाहतूक करणार्या अशोक लेलँड पिकअप वाहनातून बेलीे मिनरल वॉटरच्या खोक्याखाली देशी दारूचा माल घेऊन जात असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. याची सूचना लगेच त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पांडे यांना दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी पांडे यांनी याबाबत डी.बी. इन्चार्ज पोलिस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे यांना कळविले. दुपारी ४ वाजताच्या सुमारास बेलसरे, प्रदीप पाटील, डीबी कर्मचारी व दोन पंचांना घेऊन खांबाड्याला गेले. तिथे कोव्हीड – १९ संबंधाने चंद्रपूर जिल्हा सीमा नाकाबंदीचा पोलीस स्टाफ उपस्थित होता. नाकाबंदी दरम्यान सायंकाळी ५.५८ वाजताच्या सुमारास मुखबिराने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे अशोक लेलँड मालवाहतूक पिकअप गाडी, पांढ?्या आय – २0 हुंडई कारच्या मागून नागपूर रोडवरून चंद्रपूरच्या दिशेने येताना दिसली.
चेक पोस्टवर थांबवून त्याची तपासणी केली असता आय – २0 हुंडई चारचाकी वाहन क्रमांक एम. एच. ४९ बीके ३0३५ मधील ड्रावर मध्ये ५00 च्या नोटांचे दोन बंडल एकूण १ लाख रुपये व लोकेशन देण्यासाठी वापरण्यात येणारा मोबाईल किंमत २0 हजार रुपये व चारचाकी किंमत ७ लाख रुपये जप्त करून कार चालक निलेश सलोटे ( वय २९ वर्षे ) रा. वाठोडा, नागपूर याला ताब्यात घेतले. तद्नंतर पिकअप क्र. एम.एच. एटी २७0४ ची झडती घेतली असता त्यात बेली कंपनीचे मिनरल वॉटर ५00 मि.ली. चे ३0 बॉक्स वर ठेऊन त्याचे खाली रॉकेट कंपनीचे ९0 मि.ली. देशी दारूच्या निपा ( बॅच नबर १७९ मार्च २0२१ ) असे लेबल लावलेले १५0 बॉक्स, प्रत्येक बॉक्स मध्ये १00 नग एकूण १५000 नग निपा किंमत १५ लाख रुपये आढळून आले . गाडी चालक राहील सलीम खाँ पठान ( वय १९ वर्षे), शेख जुबेर शेख गुलाब ( वय २२ वर्षे), रणजित चंद्रमणी मेर्शाम (वय २४ वर्षे) सर्व रा. नागपूर यांचेकडून ३ मोबाईल फोन किंमत ३३ हजार व पिकअप वाहन किंमत ६ लाख, असा एकूण २९ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वरोरा पोलिसांनी वरील घटनेबाबत मुख्य आरोपी राहील सह अन्य तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कलम ६५ (अ ), ८३ म.दा.का प्रमाणे गुन्हा नोंदविला असून पुढील कारवाई वरोरा पोलिस करीत आहे.

Leave a Reply