उपराजधानीलाही मालमत्ता करात माफी द्या – आशिष देशमुख यांची मागणी

नागपूर : २ जानेवारी – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिका हद्दीतील पाचशे फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घर वासींयांना नव वर्षाची भेट म्हणून मालमत्ता करात माफी दिली. यात पण उपराजधानीला मालमत्ता माफी द्या म्हणत, काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा अहेर दिला आहे.
मुंबईमधील अल्प व मध्यमवर्गीय कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी नववर्षाची स्वागतार्ह भेट देत दिलासा दिला आहे. मात्र, कुठेतरी नागपूरचा विसर पडला आणि झुकते माप हे मुंबईला का? असा प्रश्न नागपूरच्या सामान्य जनतेला पडलेला आहे. नागपूरातही हजारो कुटुंब आहे, ज्यांना मालमत्ता करमाफीचा निर्णयाची प्रतीक्षा आहे, असे काँग्रेसचे नेते अशी देशमुख यांनी म्हटले आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
नागपूर भौगोलिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे. मागील दहा ते बारा वर्षात ग्रामीण भागामध्ये बाहेरून मोठ्या प्रमाणात कुटुंब कामाचा शोधात उपराजधानीत वास्तव्यास आलेले आहे. त्या सर्वांची घरे ही पाचशे फूट पेक्षा कमीच आहे. ज्या पद्धतीने मुंबईकरांना न्याय मिळतो तोच न्याय नागपूरकरांना सुद्धा मिळावा अशी अपेक्षा आहे. यात त्या मध्यमवर्ग कुटुंबियांना मालमत्ता करात सवलत देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली.
आपण राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे केवळ मुंबई, ठाणे या दोन शहराचा विचार न करता राज्यातील इतर शहरांचा सुद्धा आपल्या निर्णयात विचार करावा. मुंबई आणि ठाणेच्या धर्तीवर नववर्षाची भेट ही नागपूर येथील पाचशे चौरस पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या कुटुंबियांना माफी द्यावी.
नागपूरचा रहिवासी म्हणून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये विशेष करून हा मुद्दा घेऊन जनतेसमोर एकत्र यावे. त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करावे. यात याअगोदरच जर मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतला तर, नक्कीच नागपूरकरांना मदत होईल अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply