अनिल देशमुख यांच्याविरोधात विशेष ईडी न्यायालयात ७ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

मुंबई : २९ डिसेंबर – १०० कोटी वसुली प्रकरणाची चौकशी करत असताना अंमलबजावणी संचालनालय या केंद्रीय तपास यंत्रणेला अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती मिळाली असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने केला होता. याच प्रकरणी ईडीचा तपास आता पूर्ण झाला असून अंमलबजावणी संचालनालयाने आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र ७ हजार पानांचे असून यात अनिल देशमुख यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. तर सह आरोपी म्हणून अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना दाखवले गेले आहे.
या आरोपपत्रात अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने फरार घोषित केले आहे. या प्रकरणात एकूण 3 जणांना ईडीने फरार घोषित केले आहे. वारंवार समन्स देवून देखील अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हा चौकशीला हजर राहिला नाही मात्र याप्रकरणी अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावे या करता ऋषिकेश देशमुख याने न्यायालयात धाव घेतली होती पण याप्रकरणी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे.
अनिल देशमुख यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करत असताना अनिल देशमुख यांच्यासह त्या यांच्या घरातील अनेक सदस्य तसेच त्यांचे खाजगी सचिव श्री साई शिक्षण संस्था या संस्थेत पदाधिकारी होते. या श्री साई शिक्षण संस्थेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा करत ईडीने याप्रकरणी अनिल देशमुख यांना चौकशीला बोलावलं होतं मात्र देशमुख यांनी आपले सर्व न्यायालयीन अधिकार वापरले. या दरम्यान आपण आरोपीच आहात असा खुलासा तपासून यंत्रणांकडून न्यायालयात करण्यात आल्यानंतर अनिल देशमुख चौकशी करता ईडी कार्यालयात हजर राहिले आणि अनिल देशमुख यांची 13 तास चौकशी केल्यानंतर त्यांना ईडीने अटक जाहीर केले.
अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर तात्काळ त्यांना न्यायालयीन कोठडी मिळावी, या सोबतच त्यांना तत्काळ जामीन मिळावा याकरता आणि देशमुख यांच्याकडून खूप प्रयत्न करण्यात आले. मात्र अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीचे यांचे म्हणणे प्रत्येक वेळेस कोर्टाने मान्य केल्याने 14 दिवसांपेक्षा जास्त अंमलबजावणी संचालनालय कोठडीत अनिल देशमुख यांना काढावे लागले तर अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून जेलची हवा खात आहे. या प्रकरणी आज अंमलबजावणी संचालनालयाने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

Leave a Reply