ओंजळीतली फुलं -२ – महेश उपदेव

28 dec mahesh updeo final

वॉकर रोड २

बालवयात संघात जात असल्यामुळे चांगले संस्कार घडत होते,व्यायामाची सवय लागली होती,कधी नागपूर व्यायाम शाळा तर कधी चिटणीस पार्क मध्ये व्यायाम शाळेत जात होतो, पण खोडकर पणा जात नव्हता, शाखे मध्ये जात असल्यामुळे एक दंडा मिळाला वेटाळातील सात आठ मुलांनी सात आठ दंडे (काठया) जमा केल्या. याचा उपयोग सुरकांडी खेळण्या करीता करत होतो, रोज पहाटे चिटणीस पार्कच्या उतारा पासून वॉकर रोड पर्यत आमचा खेळ चालायचा ती ऐक वेगळी मजा होती, यावेळी महापालिकेची निवडणूक आली ,उमेदवाराच्या चिन्हाचे बिल्ले जमा करायची पैज लागायची, त्यावेळी छोटुभाऊ धाक्रस बाबांचे मित्र जनसंघाकडून निवडणूक लढत होते, त्यांच्या प्रचारात आमचा पुढाकार होता, घरोघरी ब्बिल्ले वाट०ो ,प्रचार पत्रक वाटणे हे आमचे काम होते, त्यावेळी जनसंघाचे घोष वाक्य होते घर घर मे दीप जले,जनसंघ को व्होट मिले, माझे अक्षर चांगले असल्याने गेरू ने भिंत रंगवायचे काम मी केले, मला शाबासकी म्हणून खूप सारे बिल्ले मला मिळाले, वेटाळात मी पैज जिंकली.तेव्हा आम्ही एक नारा दयायचो भाजीत भाजी वाग्यांची सोडा लुंगी बर्धन ची , पाचवीत असल्याने फारसे आम्हाला कळत नव्हते, मात्र आम्ही जाबुवंत राव धोटे यांचे फॅन होतो, वारे शेर आया शेर हे वाक्य आम्हाला भावत होते.

होळीची मजा

होळी येण्याच्या दहा दिवस अगोदर वेटाळातील मुल कोणाचे लाकडी फाटक तोडायचे हेरून ठेवत होतो, तसेच पहाटे कॉटन मार्केट मध्ये वॉकर रोडने बैल गाडया बंडया जायच्या त्याच्या उभारया चोरण्यात मजा यायची ,चार मुले रोडच्या बाजूला उभे राहायचे तर चार मुले एका बाजूला उभे राहून चोर्यकर्म करीत होतो, बंडीवाला मुलांच्या मागे धावला की दुसरी टिम उभारी घेवून पळून जायची, काही नाही मिळाले तर वंगणाची कुप्पी चोरून आणायचो, हे वंगण रंगपंचमी च्या दिवशी चेहर्याजा फासत होतो, हा स र्व माल अपशंकर यांच्या वाडयात लपवून ठेवायचो, आमच्या वेटाळात एक खडूस म्हातारा होता तो आम्हाला नेहमी शिव्या द्यायचा त्यामुंळे पोट्टे त्रस्त होते, होळीच्या दिवशी त्याची खाट होळीत टाकून त्याचा बदला घेतला त्यामुळे आम्हाला होळी नंतर मार पडला, तोच म्हातारा आम्हाला वाचवायला आला असे अनेक किस्से रोज घडायचे.

अद्दल घडविली

प्रायमरी शाळेतून मी सी पी अँण्ड बेरार मध्ये पाचवीत प्रवेश घेतला  तेथे ही आमची मस्ती सुरुच होती, सी पी अँण्ड बेरार प्राथमिक शाळेतून मिडल स्कूल मध्ये आलो होतो, आमच्या शाळेच्या खिडक्या मोठया होत्या त्या आजही आहेत, एका टारगट पोराने बिंझानी कॉलेज च्चा एका मुलीला बोराची आठोळी गुल्हेरने मारली ती मुलगी तक्रार घेवून  वर्ग शिक्षकाकडे आली, खिडकी जवळ मी बसलो होतो , मला जातीवाचक शिवी देवून मास्तराने वर्गा समोर शिक्षा केली, माझा गुन्हा नसताना मला शिक्षा झाली, तो राग माझ्या मनात होता, हिवाळा होता सायंकाळी अंधार लवकर पड़ायचा, ज्या मास्तरने शिक्षा केली तो सायकलने आमच्या गल्लीतून जायचा ते मी हेरुन ठेवले होते, एक दिवस सायंकाळी मास्तर दिसले सायकलची तुटलेली चेनचा फटका मास्तराच्या पाठीत मारून पळून गेलो, अंधार असल्यामुळे मी दिसलोच नाही, तेव्हा पासून या मास्तराने जातीवाचक शिवी देणे बंद केले, असे अनेक प्रताप बालवयात केले त्यासाठी खूप मार खाल्ला,अभ्यासासाठी जेवढा मार खाल्ला नाही तेवढा मार खोडकरपणा साठी खाल्ला.

निपुत्रीक चौक

आज जो पंडित बच्छराज व्यास चौक आहे त्याचा मोठा इतिहास आहे तेथे पूर्वी मोठमोठे आंदोलने झाली, या चौकाचे खरे नाव निपुत्रीक चौक आहे, त्यावेळी या चौकात चार बंगले होते त्यांना पुत्र नव्हते, त्यांनी दत्तक मुले घेतली आहे, त्यानंतर या चौकाचे नाव बडकस चौक झाले, रामभंडार संस्थापक मातादीन गुप्ता वेटाळातील मुलांवर खूप प्रेम करायचे,शाखेतून सायंकाळी घरी जाताना आम्हाला आवाज देवून एकक पेढा आमच्या हातात दयायचे

१९७२ मध्ये महाल, वॉकर रोड सोडून राणा प्रताप नगर मध्ये राहायला आलो पण महालचे प्रेम कमी झाले नाही, जुने मित्र भेटले की जुण्या आठवणींना उजाळा मिळतो.

जय महाराष्ट्र

महेश उपदेव

Leave a Reply