बिहारमध्ये नूडल्स कारखाण्यात बॉयलर फुटल्याने झाला स्फोट, ५ जणांचा मृत्यू

मुझफ्फरपूर – बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये कुरकुरे नूडल्स कारखान्यात बॉयलर फुटल्याने स्फोट झाला आहे. जिल्ह्यातील बेला औद्योगिक परिसरात ही घटना घडली. यात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात लोक जखमीही झाल्याचं सांगण्यात येत आहे.
हा स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज घटनास्थळापासून पाच किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
स्थानिक लोकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. तर स्फोट झाला, तेव्हा कारखान्यात किती लोक काम करत होते, याची माहिती मागवण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. याशिवाय, या स्फोटामुळे बाजूच्या परिसरात असलेल्या कारखान्यांच्या भीतींना तडे गेले आहेत.

Leave a Reply