नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढतीवर, आज ३३ रुग्णांची नोंद, निर्बंध लागू

नागपूर : २६ डिसेंबर – काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना व्हायरस पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला आहे. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यातच आता नागपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरात कोरोनाचं चित्र अवघ्या चार दिवसात बदलेलं दिसलं आहे.
नागपूरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. नागपुरात रविवारी म्हणजेच आज ३३ कोविड रुग्ण आढळून आले आहे.
कोरोना रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. गुरुवारी हा आकडा ६ होता. तर शुक्रवारी तो वाढून १० वर पोहोचला. तर धक्कादायक म्हणजे शनिवारी हा आकडा २४ झाला. तर रविवारी कोरोना रुग्णांची संख्या ३३ वर जाऊन पोहोचली.
महाराष्ट्रात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. गेल्या एका दिवसात कोरोनाचे १४८५ रुग्ण आढळले आहेत. नवीन वर्षापूर्वी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्य सरकार चिंतेत आहे. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात संसर्ग टाळण्यासाठी पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Leave a Reply