कानपूरच्या परफ्युम आणि पान मसाला व्यावसायिकाकडे आढळले १५० कोटींचे घबाड

कानपूर : २४ डिसेंबर – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी आयकर विभाग, ईडी आणि जीएसटीच्या टीम सक्रिय आहेत. प्राप्तिकर विभागाच्या पथकाने गुरुवारी कन्नौजचे मोठे परफ्यूम आणि पान मसाला व्यावसायिक पियूष जैन यांच्या घरावर आणि ठिकाणांवर छापे टाकले. आतापर्यंत जवळपास १५० कोटींची बेनामी मालमत्ता आढळल्याचं सांगण्यात येतंय.
मुंबई, कन्नौज आणि कानपूरमध्ये ‘समाजवादी परफ्यूम’ लॉन्च करण्यात मोलाचा वाटा असलेले कन्नौज व्यापारी पियूष जैन यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी सकाळी छापे टाकले. तिन्ही ठिकाणी एकाच वेळी सुरू झालेली ही कारवाई दोन-तीन दिवस चालण्याची शक्यता आहे.
करचोरीसह बोगस कंपन्या बनवून मोठ्या प्रमाणात पैसा वळवल्याची कागदपत्रे आयकर विभागाला मिळाली आहेत. पियूष जैन हे अखिलेश यादव यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते.
पियूष जैन हे मूळचे कन्नौजचे. ते परफ्यूमचा मोठे व्यापारी आहेत. त्यांचे परफ्युमही निर्यात केले जाते. पियूषच्या कुटुंबातील अनेक जण कानपूर आणि मुंबईतही राहतात. त्यांची कार्यालयेही आहेत.
एक टीम कन्नौजला गेली, तर दुसरी कानपूरला राहिली. कानपूर आणि कन्नौजसह मुंबईतील पियूषच्या लपलेल्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी एकाच वेळी गुरुवारी सकाळी छापे टाकले. आनंदपुरीतील पियूषच्या बंगल्यावर ४ लहान आणि एक मोठ्या नोटा मोजण्याचे मिशीन घेऊन आयकर पथक पोहोचले होते.
पियूष हे कन्नौजच्या परफ्यूम लॉबीचा सदस्य आहे. ते अखिलेश यादवच्या अगदी जवळचे आहेत. पियूषचे कुटुंब ७-८ वर्षांपूर्वी आनंदपुरी कॉलनीत राहायला आले होते. कन्नौजमध्येही ते सार्वजनिक ठिकाणी क्वचितच दिसतो.
मुंबईहून आलेली ही प्राप्तिकर विभागाची टीम आहे. कथित करचोरी आणि बोगस कंपन्या स्थापन करून पियूष यांच्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पैशांच्या गैरव्यवहार गेल्या काही महिन्यांपासून प्राप्तिकर विभाग लक्ष ठेवून होता. प्राप्तिकर विभागाच्या दोन टीम मुंबईहून बुधवारी रात्र कानपूरला पोहोचल्या, अशी माहिती सूत्रांनी दिलेली.

Leave a Reply