गतिमंद तरुणीवर नराधमाने केला अत्याचार

नागपूर : २४ डिसेंबर – नागपूर शहरातील शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत एका २0 वर्षीय गतिमंद तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. ही तरुणी घरी एकटी असल्याची संधी बघत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. शेजारच्या महिलेच्या सबब प्रकार लक्षात आल्यानंतर या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी या नरधमाला अटक केली आहे. अजय विजय बावणे (वय २0) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आर्थिक स्थिती बेताची आहे. आई-वडील हे मोलमजुरीच्या कामावर आहेत. कामानिमित्त ते दोघेही दिवसभर बाहेर असतात. अशावेळी ही गतिमंद तरुणी घरी एकटीच असते. अशातच, आरोपी विजय बावणे हा पीडितेच्या वस्तीतच वास्तव्याला आहे. त्याने मंगळवारी तरुणी घरी एकटीच असल्याची संधी साधली. तो तिच्या घरात शिरला आणि तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, पीडितेवर अत्याचार केल्यानंतर आक्षेपार्ह अवस्थेत घराबाहेर पडताना आरोपीवर शेजारी राहणार्या महिलेची नजर पडली. त्यामुळे या महिलेने सबब प्रकार हा पीडितेच्या घरी सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने तिला विचारणा केल्यानंतर तिने हातवारे करून घटनेवर प्रकाश टाकला.

Leave a Reply