यवतमाळमध्ये ५० वर्षीय इसमाने केला ९ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

यवतमाळ : १७ डिसेंबर – आर्णी तालुक्यातील जवळा येथे एका ५0 वर्षीय इसमाने ९ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची संताप जनक घटना काल संध्याकाळी ५ वाजता घडली आहे
सदर घटनेची फिर्याद आर्णी पोलिस स्टेशनला पीडित चिमुकली च्या आईने दिली आहे. चिमुकली खेळून आपल्या घरी जात असताना आरोपी तुकाराम किसन सिंगाडे (५0) राहणार जवळा याने चिमुकलीला पन्नास रुपयाचे आमिष दिले व आपल्या राहत्या घरी किचन रूम मध्ये नेऊन चिमुकलीवर अत्याचार केला. सदर घटना चिमुकलीने घरी येऊन आपल्या आईला सांगितली असता आईने तात्काळ आर्णी पोलीस स्टेशन गाठून वरील आरोपीविरुद्ध फिर्याद दिली फियार्दीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ३६६ अ, ३७६ अ, ब, ३७६ (२) जे ३७७,४,६, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आर्णी पोलिसांनी आरोपीला रात्रीच अटक केली आहे. तसेच पुढील तपास आर्णी पोलिस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश जायले करीत आहे. या घटनेने परिसरात सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे.

Leave a Reply