विधानपरिषद निवडणुकीत नागपूर व अकोला दोन्ही जागांवर भाजप उमेदवारांचा विजय

नागपूर : १४ डिसेंबर – राज्यातील विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजुने लागला आहे. भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे हे विजयी झाले झाले आहेत. या निवडणुकीत ५५९ मतदारांपैकी ५५४ मतदारांनी या निवडणुकीत हक्क बजावला. यात बावनकुळे यांना ३६२ मते मिळालीत तर मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळालीत. तर ५ मते बाद झालेत. नागपूरनंतर अकोलाही भाजपने सर केले आहे. भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला आहे. वसंत खंडेलवाल यांना ४४३ मत तर शिवसेनेचे गोपिकीशन बाजोरिया यांना ३३४ मते मिळाली. तर १३ मते बाद झालीत. राज्यातील एकूण सहा जागांसाठी ही निवडणूक होणार होती त्यापैकी चार जागांवर निवडणूक ही बिनविरोध झाली होती. नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा या दोन्ही जागांवर भाजप उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
आज झालेल्या मतमोजणी प्रक्रियेमध्ये नागपुरात एकूण ५४९ मतं वैध ठरल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. त्यामध्ये विजय मिळवण्यासाठी २७५ मतं मिळवणं आवश्यक होतं. यात भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना एकूण ३६२ मतं मिळाली असून रवींद्र भोयर यांना अवघं एक मत मिळालं आहे. तर काँग्रेसचे उमेदवार असलेले मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली आहेत. नागपुरात काँग्रेसची मतं मोठ्या प्रमाणावर फुटल्याचं सांगितलं जात आहे.
एकीकडे नागपुरात चंद्रशेखर बावनकुळेंनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असताना दुसरीकडे अकोल्यातही हेच चित्र दिसून आलं. अकोल्यातील मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा भाजपाचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांच्या पारड्यात तब्बल ४४३ मतं पडली होती, तर शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना ३३४ मतं पडली होती. या प्रक्रियेमध्ये ३१ मतं बाद ठरली.
नागपूरमध्ये काँग्रेसनं ऐनवेळी उमेदवार बदलल्याचा मोठा फटका पक्षाला बसल्याचं आता बोललं जात आहे. आधी छोटू भोयर यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी पक्षानं उमेदवार बदलून छोटू भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना आपला पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे भोयर यांना या निर्णयाविषयी कोणतीही कल्पना नसल्याचं नंतर समोर आलं.

Leave a Reply