वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

लोकशाहीचे बारा

आमदार ,खासदार, मंत्री झाले दागी
आघाडीचं सरकार हे अक्ख झालं दागी !

इकडे तिकडे चोहिकडे दिसती दागी दागी !
औषधालासुद्धा नाही उरले बेदागी !

दागी असणं झालं आता योग्यतेचं माप !
घोटाळ्याचं पीक म्हणून आलसे अमाप !

तिकीट मिळे त्यांना जेही पैसेवाले मोठे !
इथे आता चालती फक्त शिक्के खोटे खोटे !

भगवे झाले केविलवाणे हिरवे शिरजोर
मागेपुढे त्यांच्या धावती सैनिकांचे पोरं

सारी खाती वाटती त्यांना असती खायासाठी !
जन्म त्यांचा झाला जणू वसुलीच्यासाठी !

मतदार मायबापहो कर्तव्याला जाणा
बेदाग्यांना शोधुन त्यांना निवडुनिया आणा

नाहीतर लोकशाहीचे पुरे बारा वाजतिल
मुख्यमंत्री पदावरी जोकर बसले दिसतिल !

          कवी -- अनिल शेंडे 

Leave a Reply