गोशाळेत शिरून वाघाने केले दोन गायींना ठार

चंद्रपूर : ३ डिसेंबर – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या गोंदेडा येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गोशाळेत शिरून वाघाने दोन गायींना ठार केल्याच्या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.
गोंदेडा गुंफा हा परिसर जंगलाने व्यापलेला असून, हा परिसर व्याघ्र प्रकल्प ताडोबाला लागून आहे. या भागात नेहमीच वाघाचा वावर राहत असल्यामुळे या परिसराती नागरिक नेहमीच दहशतीत राहतात. याच ठिकाणी सर्वात मोठी वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज गोशाळा असून, येथे मोठय़ा प्रमाणात गायी, गोरे, लहान कालवड आहेत. गोशाळेच्या चारही बाजूने संरक्षण भिंत तयार केली आहे. आतमध्ये गायीचा गोठा आहे. गायी गोठय़ात असताना दोन गायी संरक्षण भिंतीच्या आत बसल्या होत्या. साईडच्या संरक्षण भिंतीला लागून वाघ बसला असावा व त्यांना वास लागतातच संरक्षण भिंत फोडून गायीवर हल्ला केला. यात एक गाय ठार केली. त्या गायीला ओढत नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, गाय मोठी असल्याने तिला बाहेर नेता आले नाही व दुसऱ्या गायीने पळविण्याचा प्रयत्न केला असता तिला ठार केले. या दोन्ही गायीला बाहेर नेण्याचा वाघाने प्रयत्न केला. पण, नेता आले नाही व वाघ तेथुन बाहेर निघून गेला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सकाळी गोशाळेच्या कर्मचारी गोशाळेत गेले असता त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यांनी वनविभागाच्या अधिकार्यांना फोन केला. व नेरी येथील क्षेत्र सहायक रासेकर यांनी आपल्या सहकार्यांसोबत घटनास्थळी दाखल होऊन मृत गायीचा पंचनामा केला. परिसरात घटना घडली असल्याने दहशत निर्माण झाली आहे. तरी वनविभागाने वाघाला त्वरित जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांची आहे.

Leave a Reply