नागपुरात परराज्यातून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी नवीन नियमावली निश्चित

नागपूर : ३० नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमायक्रॉन हा नवा विषाणू आढळून आला आहे. या नव्या विषाणूमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. यामुळेच खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारसह स्थानिक प्रशासनाकडूनही महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी निर्बंध कठोर करण्यात येत आहेत. नागपूर जिल्हा प्रशासनाने सुदधा खबरदारी म्हणून परराज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी काही नियमावली निश्चित केली आहे.
नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड संदर्भातील सद्यास्थिती लक्षात घेता नवे आदेश जारी केले आहेत. यामध्ये तिकीट असणाऱ्या किंवा नसणाऱ्या कार्यक्रमात लसीकरणाशिवाय सहभागी होता येणार नाही. मॉलपासून बाजारापर्यंत, सार्वजनिक प्रवासी यंत्रणेचा प्रवासी वापर, सर्व आस्थापनावरील भेटी, नागपूर जिल्ह्यात प्रवेश यासाठी संपूर्ण लसीकरण आवश्यक करण्यात आले आहे.
चित्रपट, नाट्यगृह उपस्थिती क्षमतेच्या ५० टक्के अनुमती देण्यात आली आहे. १ हजारापेक्षा गर्दीच्या कार्यक्रमासाठी माहिती प्रशासनाला देणे आवश्यक आहे. यासंदर्भात नियम न पाळणाऱ्यांना ५०० ते १० हजारापर्यंत दंड आकारण्यात आला आहे. सोबत कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना सक्तीचे विलगीकरण व इतर कडक करण्यात आले.
सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेला झीरो सर्वेचा अहवाल पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. या अहवालात सहा हजार लोकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते, त्यामध्ये त्यांच्या शरीरात असलेली अँटीबॉडी चेक केली जाणार आहे.

Leave a Reply