वाघाच्या नखे व दातांची विक्री करणारे ५ आरोपी जेरबंद

नागपूर : २४ नोव्हेंबर – उमरेड बसस्थानकाजवळ वाघांच्या दातांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राच्या पथकाद्वारे सापडा रचण्यात आला. लगेच तीन आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीनंतर माहितीच्या आधारी मेळघाट सायबर सेलच्या मदतीनं आणखी दोन आरोपी सापडलेत.
वाघांचे दात विकणाऱ्या पाच आरोपींना वनविभागानं उमरेड बसस्थानकाजवळ जेरबंद केलं. वाघांची नख आणि दातही जप्त करण्यात आलेत.
खडकळा येथील ताराचंद महादेव नेवारे (४१), वाढोणा येथील दिनेश कवटू कुंभले (३०) व अजय राजू भानारकर (२४), सोनपूर (तुकुम) येथील प्रेमचंद वाघाडे (५०), नागभिड तालुक्यातील खडकळा येथील राजू कुळमेथे (३८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वन्यजीव (संरक्षण) अधिनियमाअंतर्गत आरोपींविरुद्ध गु्न्हा नोंदविण्यात आलाय. आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता उमरेड उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक एन. जी. चांदेवार यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे राजू कुळमेथे हा आरोपी व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे. तर, ताराचंद नेवारे हा पीआरटीचा सदस्य आहे.

Leave a Reply