काँग्रेसतर्फे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी रवींद्र उर्फ छोटू भोयर यांचा नामांकन अर्ज दाखल

नागपूर : २३ नोव्हेंबर – विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी एका दिवसापूर्वीचा भाजपाला रामराम करून आलेले रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी नामांकन अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यलयात त्यांनी काँग्रेसच्या नेतेमंडळीसोबत नामांकन दाखल केले. यावेळी आयात उमेदवाराच्या भरवशावर निवडणूक जिंकणार का? पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देतांना ग्रामीण भागात पकड असलेले पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी निवडणूक ही जिंकण्यासाठी लढतो, असे म्हणाले. यात भाजपाकडे मतांच्या बेरजेचे मॅजिक फिगर गांठताना संख्याबळ आता तरी नक्कीच जास्त आहे. पण यामध्ये छोटू भोयर यांना रिंगणात उतरवले असताना काँग्रेसचे सर्व लोक एकत्र येऊन किती ताकदीने पाठीशी राहील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून छोटू भोयर यांनी आपला नामांकन अर्ज भरला. यावेळी अर्ज दाखल केल्यानंतर छोटू भोयर यांनी मीच विजयी होणार असे बोलून दाखवले. रिंगणात असणाऱ्या उमेवारांचे हे बोलणे काही नवीन नाही. पण पाठीमागे असणाऱ्या ताकदीमध्ये काँग्रेसचे नेते पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे हे होते. मात्र यावेळी काही काँग्रेस नेत्यांची अनुउपस्थिती बरेच काही सांगुन जाते. डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणूकीत भाजपाकडे मताधिक्य आहे, असे सांगितले जात असले तरी सहज अशी निवडणूक होणार आहे. यात काँग्रेसचे मंत्री आणि पदाधिकारी यांनी मनावर घेतल्यास ही निवडणूक नक्कीच सोपी नसणार आहे. यामुळे या निवडणुकीत चांगली रंगत येणार आहे. यात छोटू भोयर हे भाजपाचे मतदार फोडणार की भाजपा काँग्रेसचे मत फोडणार याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply