सत्ता गेल्यावर अस्वस्थसा इतक्या टोकाला जाऊ नये – शरद पवार

नागपूर : १७ नोव्हेंबर – सत्ता गेल्यावर माणसे अस्वस्थ होतात, पण अस्वस्थता इतक्या टोकाला जाऊ नये अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज पत्रकारांशी बोलताना केली. मुंबईत भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलतांना फडणवीसांनी अमरावती, मालेगाव, व नांदेडमधील हिंसाचार हा प्रयोग असल्याचे वक्तव्य केले होते, देशात अराजक निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारविरोधात विचारपूर्वक केलेला प्रयोग असल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्यावर फडणवीसांच्या बोलण्याचे आश्चर्य वाटते असा टोलाही त्यांनी लगावला.
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये आघाडी केलेले पक्ष एकत्र आले तर योग्यच होईल नाहीतर आम्ही एकटे स्वबळावर लढू अशी माहिती शरद पवार यांनी दिली. चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर शरद पवार यांचे आज दुपारी नागपुरात आगमन झाले. नागपुरातील उद्योजकांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येत्या काही महिन्यात होऊ घातल्या आहे. या निवडणुकीत आपण महाविकास आघाडी एकत्र लढणार का? असा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की आघाडीच्या पक्षांनी एकत्र लढावे ही आपली इच्छा आहे. बाकी पक्ष सोबत येत नसेल तर आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
एसटीचा संप तुटेपर्यंत ताणू नये असं सांगत शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या, काही प्रश्न सरकारला सोडवावे लागतील. एसटी महामंडळांचं विलीगीकरण लगेच शक्य नाही असं शरद पवारांनी सांगितले आहे.
राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. मंत्री नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असणारे पुरावे मी शरद पवारांना देणार असं फडणवीस म्हणाले होते. यासंडासर्भात विचसारले असता, शरद पवार म्हणाले की, फडणवीसांनी अद्याप पुरावे आणून दिले नाहीत.
अनिल देशमुख यांच्याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की बेछूट आरोप करायचे आणि त्याला सामोरं जायचं नाही. पोलीस आयुक्त परमवीर सिंह आता कोठे आहेत? यामुळेच अनिल देशमुखांना काही संबंध नसताना कोठडीत जावे लागले. काहीही संबंध नसताना त्यांना कोठडीत जावं लागतं हा त्यांच्यावर अन्याय आहे असं सांगत पवारांनी भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी राष्ट्रवादीची दुकानदारी संपवू एकाची संपली दुसऱ्याचीही दुकानदारी विदर्भातून संपवू असा इशारा दिला आहे याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की आमची विचारधारा गांधी नेहरूंची विचारधारा आहे, काँग्रेसची मिळतीजुळती असल्यामुळे आम्ही विचार मांडतो एखादा व्यक्ती लोकसभा भाजपमधून लढतो ते विधानसभा भाजपकडून लढले त्या विचारधारेच्या मानसिकतेतून त्यांनी आरोप केला असेल असा टोला त्यांनी
मारला. महात्मा गांधींना साऱ्या जगाने स्वीकारले असं सांगत अभिनेत्री कंगना रणौतच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली. अमरावतीमधील दंगलीत भाजपसह रझा अकादमी चाही हात असल्याचे बोलले जाते याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मला यातील वस्तुस्थिती माहिती नाही नेमकी माहिती घेऊन मी बोलेन. अफवेतून चुकीच्या काही घासताना घडल्या असतील तर चौकशीनंतर कारवाई होईल.

Leave a Reply