शरद पवारांनी अमरावतीत पाय ठेऊ नये – अनिल बोंडे यांचा इशारा

अमरावती : १७ नोव्हेंबर – राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी शरद पवार हे विदर्भाचा दौरा कोणत्या तोंडाने करीत आहेत असा संतप्त सवाल अनिल बंडे यांनी केला आहे. अमरावतीत पाय ठेवू नये, असा इशाराही अनिल बोंडे यांनी शरद पवारांना दिला आहे. पवारसाहेब तुम्ही अमरावतीत येऊ नका, तुम्हाला नागरीक आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल. शरद पवार हे विदर्भाचा दौरा करीत आहेत, ते कोणत्या तोंडाने करीत आहेत हे माहित नाही, असेही अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.
अमरावतीत ज्या ४० हजार मुस्लिमांना मोर्चा काढला, त्यामागे नवाब मलिक आहेत. या नवाब मलिकांसोबत दंगलीच्या सुत्रधारांचे फोटो झळकत आहेत. या नवाब मलिकांचे संरक्षक हे शरद पवार आहेत. तरी देखील शरद पवार कोणत्या तोंडाने विदर्भ दौऱ्यावर येत आहेत, ते समजत नसल्याचं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे. विदर्भात अवकाळी पाऊस, संत्रा फळगळती, पिक विमा यांची कोणतीही भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही, तरी देखील शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर कोणत्या तोंडाने आले आहेत, हे समजत नसल्याचं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply