हरियाणाची कुस्तीपटू निशा दहिया हिची गोळी मारून हत्या

सोनीपत : १० नोव्हेंबर – हरियाणाच्या सोनीपतची राष्ट्रीय कुस्तीपटू निशा दहिया हिची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी निशाशिवाय तिचा भाऊ आणि आईवरही गोळीबार केला. या हल्ल्यात निशा आणि तिच्या भावाचा मृत्यू झाला, तर तिच्या आईची प्रकृती गंभीर आहे. निशाच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोनीपतच्या हलालपूर गावातली ही घटना आहे. या गावात सुशील कुमारच्या नावाने अकॅडमी आहे. तिकडेच हल्लोखोरांनी निशा दहियावर हल्ला केला. निशा तिचा भाऊ सूरज दहिया आणि आई धनपती यांच्यावर अंधाधूंद गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
हल्ला केल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी तिकडून पळ काढला. निशा आणि तिच्या भावाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर अवस्थेत असलेल्या निशाच्या आईला रोहतकच्या पीजीआयमध्ये पाठवण्यात आलं. तिकडेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. निशा आणि तिच्या भावाची हत्या का करण्यात आली, याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
सोनीपत पोलिसांनी निशा आणि सूजर यांचं पार्थिव पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे. खरखोदा पोलीस या हाय प्रोफाईल डबल मर्डरचा तपास करत आहे. पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक पैलू तपासत आहेत. राष्ट्रीय कुस्तीपटू आणि तिच्या भावाच्या हत्येनंतर परिसरात दहशतीचं वातावरण आहे.

Leave a Reply