एकाच दिवशी एक सामूहिक बलात्कार तर दोन विनयभंगाच्या घटना

नागपूर : २५ एप्रिल – आई मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याने आणि वडील सोडून गेल्याने मामानेच भाचीचा सांभाळ केला. मात्र, ती मुलगी वयात येताच वर्गमित्राच्या प्रेमात पडली. त्याची चमकधमक पाहून ती त्याच्यावर लगेच विश्‍वास करून बसली. त्या प्रियकराने आणि त्याच्या मित्रांनी त्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला. तर एका विवाहितेवर तिच्या फेसबुक फ्रेंडने अत्याचार करून तिचे आपत्तीजनक फोटो आणि व्हिडीओ वायरल केल्याची घटना सीताबर्डी हद्दीत समोर आली. तर एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शांतीनगर हद्दीत समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, १६ वर्षांची मुलगी ही तिच्या आईसोबत तिच्या मामाच्या घरी राहते. तिच्या आईची मानसिक स्थिती बिकट आहे. तर मुलीचे वडील वर्धा येथे राहतात. मुलीच्या वडिलांनी मुलीला आणि तिच्या आईला खूप आधी सोडले होते. मुलगी गरीब घरची आहे. ती अकराव्या वर्गात शिकते. तिच्या वर्गात शिकणार्‍या वर्गमित्र वैभवशी तिचे प्रेमप्रकरण सुरू झाले. तो पीओपीचे काम करतो. त्याचे राहणीमान सुखवस्तू घरातील असल्याचे तो दाखवित होता. मुलीला बाहेर फिरायला घेऊन जाणे, तिला हॉटेलात खाऊपिऊ घालणे, यामुळे ती अधिकच त्याच्या आहारी गेली होती. ते नेहमीच फिरायला जायचे. २२ एप्रिलला सकाळी ११ वाजताच्या सुमारास कौशल्यनगर येथे राहणार्‍या वैैभव ज्ञानेश्‍वर घोडेस्वार (२0) रा. कौशल्यानगर गल्ली क्र. १७ याने मुलीला फिरायला जाऊ, असे म्हटले. पीडित मुलीला वैभव आणि त्याचा एक मित्र अजनी हद्दीतील रेल्वे क्वार्टरमध्ये घेऊन गेले. त्यानंतर वैभव तेथेच थांबला तर दुसरा मुलगा त्यांना सोडून निघून गेला. अजनीतील बरेच रेल्वे क्वॉर्टर रिकामे आहेत. त्यामुळे तेथे सर्रास गैरप्रकार चालतात. त्या क्वार्टरमध्ये अमन सुनील नागदिवे (१८) तसेच १६ आणि १७ वर्षीय मुले आधीच त्या क्वार्टरमध्ये होते. तेथे वैभवने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तर आरोपी अमन आणि दोन अल्पवयीन मुलांनी मुलीवर बळजबरी अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी मुलीला तिच्या घरी सोडून दिले. मुलीने अजनी पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदविली. याप्रकरणी अजनी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध पोक्सो अँक्टअंतर्गत गुन्हा नोंदवून वैभव आणि अमन यांना अटक केली आहे.

Leave a Reply