घराजवळ गांजाची लागवड करून विक्री करणाऱ्याला आरोपींना अटक

अकोला : १ नोव्हेंबर – पैसा कमवण्यासाठी कोण कधी कशी शक्कल लढवेल याचा नेम नाही. अकोल्यात चक्क गांजाची शेती करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. घराजवळ अवैधरित्या गांजा झाडांची लागवड करून विक्री करण्यात येत होती. पोलिसांनी छापा टाकून आरोपींना अटक केली आहे.
अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवा मेळ इथं हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गांजाची झाडे जप्त करून आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई अकोला पोलिसांच्या विशेष पथकाने केली आहे. विशेष पथक मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात गस्तीवर असताना, पेट्रोलिंग करीत असताना सांगवा मेळ येथे अवैधरित्या गांजा झाडाची शेती करून विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला प्राप्त झाली.
त्यानंतर पथकाने छापा टाकत या ठिकाणी ५८ वर्षीय दिलीप बंकट सोळंके यांच्या घराजवळच्या शेतात अवैधरित्या गांज्याची लागवड केल्याचे दिसून आले. तसंच या ठिकाणी विक्रीही होत असल्याचे समोर आले. पोलिसांच्या विशेष पथकाने झाडांसह १३ हजार ७०० रुपये जप्त केले. पोलिसांनी आरोपींकडून गांज्याची एकूण ५ झाडे जप्त केली. सर्व झाडांचे एकूण वजन १ किलो ३७० ग्रॅम आहे.
याप्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस अँक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक प्रमुख पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली .

Leave a Reply