वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

   एचएमव्हीचा इमानदार !

गेल्या काही दिवसांपासून एक मंत्री
पिसाळल्यासारखा रोज भुंकतो आहे!
तसं पाहिलं तर ज्या प्रकरणासाठी हा नित्यनेमाने भुंकतो, त्याच्याशी याचा संबंधच काय आहे ?
काहीही नाही ! तरीही हा भुंकतोच आहे !भुंकतोच आहे !
याचा अर्थच या भुंकण्यासाठी याला कोणीतरी भरपूर पगार देतो !
असा लोकांना दाट संशय येतो !
कोणी त्याला HMV चा इमानदार –म्हणतो !
कोणी त्याला आर्यनचा अनौरस — म्हणतो !
बरं हा जे जे आरोप करतो ते सर्व खोटे ठरत आहेत!
बुमरँग होऊन त्याच्यावरच उलटत आहेत !
आणि तरीही याचा तोफखाना सुरूच आहे !
बरं याचा नेमसुद्धा ” कहींपे निगाहें कहींपे निशाना ” असाच आहे !
बायांच्या नळावरील पाण्याच्या भांडणाप्रमाणे हा समोरच्याचे जात, धर्म,लग्न, आणि मायबाप काढतो आहे!
काही दिवसांपूर्वी एक मोठ्ठा मंत्रीही असाच लढत होता !
जोरदार तोंडपट्टा चालवत होता !
तो आज फरार आहे !
या नबाबी महापुरुषावरही उद्या अशीच पाळी न येवो हीच आमची सदिच्छा आहे !
शेवटी अल्लाच मलिक(सॉरी मालिक ) आहे !

          कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply