वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

छोटे मियाँ तो छोटे मियाँ
बडे मियाँ सुभान अल्ला !

नशेखोर खानबाळाला सोडवण्यासाठी राज्य सरकार तर सर्व आटापिटा करतच आहे , पण
आता केंद्र सरकारही खानपिल्लासह
सर्वच नशेखोरांना वाचविण्यासाठी नवीन कायदा बनविणार आहे !
अशी एक भयंकर खुषखबर देणार असल्याचे कळते !
केंद्र सरकारचा हा निर्णय खरोखरच स्वागतार्हच आहे !
कारण नशा करण्यासारख्या क्षुल्लक अपराधासाठी एखाद्याला जेलमधे टाकणं म्हणजे क्रौर्याची परिसीमाच आहे !
आणि तसेही केवळ नशेच्या कारणावरून कोणाला जेलमधे टाकायचं ठरवलंच तर अक्ख्या देशचाच तुरुंग करावा लागेल !
कारण , इथे नशा कोण करत नाही !
कोणी दारूची नशा, तर कोणी गांजा, अफू,चरस आदी पदार्थांची नशा करतो !
कोणाला पैशाची नशा चढते तर कोणाला सत्तेची !
कोणी साधक आपल्या कलेच्या तर कोणी कसल्या कसल्या साधनेत धुंद असतो !
आणि म्हणूनच केवळ नशेसाठी कोणालाही जेलमधे न टाकण्याचा केंद्राचा निर्णय जर झालाच तर तो अत्यन्त पुरोगामी आणि क्रांतिकारी
ठरेल !
त्यामुळे देशात एनसिबी वगैरेचीही गरज उरणार नाही !
अब्जो रुपयांचीही बचत होईल ,आणि
जगात देशाची मान उंचावल्याशिवाय राहणार नाही !

           कवी -- अनिल शेंडे.

Leave a Reply