भरधाव कार बंद हॉटेलमध्ये घुसली, दोन गंभीर

वर्धा : २० ऑक्टोबर – राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी टी पॉईंट वरील एका बंद असलेल्या हॉटेल मध्ये भरघाव असलेले चारचाकी कार घुसून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात सायंकाळी ७ वाजताचे दरम्यान घडला. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
नागपूर येथून अमरावती कडे जात असतांना कार क्रं.एमएच ०५ एजे २०९० होंडा सिटी कार तळेगाव येथील आष्टी टी पॉईंट वर असलेल्या एका बंद हॉटेलच्या शटरला धडकुन पुन्हा फिरली ज्यामध्ये हॉटेल चे शटर तुटुन हाॅटेलचे सुद्धा नुकसान झाले, तर हॉटेल समोरील टिनाचे शेड सुद्धा पूर्ण तुटले आहे, हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी वाहन जेव्हा आत घुसले तेव्हा शटर तोडून पूर्ण वाहन फिरले यामध्ये दोन गंभीर जखमी झाले तर एक किरकोळ जखमी झाला.
जखमींना तातडीने उपचाराकरीता कारंजा येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये रवाना केले. गंभीर जखमीमध्ये कार चालक सतिश शिंदे वय ३४ वर्ष रा. मुंबई, श्रीकांत मधुकर निघडे वय ३० वर्ष रा. पुणे इंजीनीअर ,तर किरकोळ जखमी शिशुपाल बिहारी रा. नोवागुडा, ता. जुनागड, उडीसा, असिस्टंड सर्वेअर हे सर्व युनिका कन्स्ट्रक्शन कंपनी एम.आय.डि.सी. कळमेश्वर चे कर्मचारी असुन कळमेश्वर वरुन गुजरातला जात असल्याची माहिती मिळाली. सदर घटनेची नोंद तळेगाव पोलीसांनी घेतली असुन सदरचा तपास तळेगाव पोलीस करीत आहे.

Leave a Reply