किरीट सोमय्या आम्हाला चॅलेंज करणारे कोण? – रोहित पवार

नांदेड : १९ ऑक्टोबर – राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक असा वाद सतत पाहायला मिळतो. अशात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोपांच्या फैरी लावल्या आहेत. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांवर आता आमदार रोहित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
पवार कुटुंबियांवर आरोप करणारे किरीट सोमय्या ईडी आणि आयटीचे प्रवक्ते आहेत का? असा थेट सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. ‘माझ्याकडे पवार कुटुंबियांबरोबर बेनामी संपत्तीचे पुरावे आहेत. ते पुरावे पवार कुटुंबीयांनी चुकीचs असल्याचे सिद्ध करून दाखवावे’ असं चालेंज किरीट सोमय्या यांनी केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना पवार यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.
आमच्यावर ईडी आणि आयटी कारवाई करेल पण किरीट सोमय्या आम्हाला चॅलेंज करणारे कोण? असा थेट सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. देवदर्शनासाठी रोहित पवार हे नांदेड इथे आले असता ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

Leave a Reply