क्षुल्लक वादातून शहरात पुन्हा एक हत्या

नागपूर : १८ ऑक्टोबर – शहरात हत्या अलिकडे नित्यनियमाची घटना झाल्याचे दुर्दैवी चित्र आहे. सातत्याने हत्यांच्या घटना घडत असताना पोलिस प्रशासनाचा गुन्हेगारांवर धाक उरलाय की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात पुन्हा हत्यासत्र सुरू झाले की काय? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
शनिवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका हत्येनंतर लगेच ६ तासांच्या अंतरातच दुसऱ्या हत्येचे प्रकरण पुढे आले. एका मागोमाग होनारीस हत्येच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कोतवाली पोलिस ठाणे हद्दीत झालेली हत्या केवळ एकमेकांकडे बघितल्याच्या क्षुल्लक कारणावरून झाली. एकमेकांकडे बघण्यावरून आधी वाद झाला. त्यानंतर वाद वाढून भांडणात त्याचे रूपांतरण होऊन हत्येची घटना घडली. विक्की दामोदर रोकडे, असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकेश रमेशराव वासनिक (वय ३५, रा. प्लॉट नंबर ३२२, चंदननगर, इमामवाडा, नागपूर) याचा मित्र विक्की दामोदर रोकडे (वय ३५, रा. अजनी रेल्वे क्वॉर्टर, नागपूर) हे दोघे १६ ऑक्टोबर रोजी, रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास कोतवाली हद्दीतील नंदाजीनगर, सिमेंट रोड, नागपूर येथे उभे होते.
या दरम्यान, आरोपी भूषण भुते, सारंग बावनकुळे (रा. भुतेश्वरनगर, नागपूर), क्रिष्णा मोदेकर, शुभम मोंढे तेथे आले. यावेळी आरोपींनी मुकेश आणि विक्कीला रस्त्यात अडविले आणि शिवाजीनगर गेटजवळ, मेनरोडवर माझ्याकडे का बघितले? या कारणावरून वाद घातला. वाद वाढला आणि त्याचे रुपांतरण भांडणात झाले. दरम्यान, रागाच्या भारात आरोपीने त्याच्या जवळ असलेल्या धारदार शस्त्राने व काँक्रीटच्या नालीवरील लोखंडी झाकनाने वार करत विक्की रोकडे याची हत्या केली. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे

Leave a Reply