ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू

यवतमाळ : १७ ऑक्टोबर – नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर आर्णी शहरातील स्वस्तिक जिनिंगजवळ १४ चाकी ट्रकने राँग साईडने येऊन दुचाकीला सामोरासमोर धडक दिल्याची घटना काल रात्री ९.३0 च्या दरम्यान घडली. यात दुचाकीस्वार दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
महेश सटवाजी सोनेवार (वय १७) व शुभम दिलीप ढोबले (वय २५) दोघेही रा. आंबेडकरनगर माहूर असे मृतक युवकांचे नाव आहे. दोन्ही मृतक युवक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्य आपल्या दुचाकी क्र एमएच २६ एपी ८0५१ ने जेतवन येथे गेले होते जेतवन येथुन आर्णीमार्गे आपल्या गावी माहूरला जात असतांना स्वस्तिक जिनिंग जवळ १४ चाकी ट्रक क्र. एमएच ३७ टी 0८१८ हा आर्णीवरून यवतमाळच्या दिशेने राँग साईडने जात असताना समोरुन येणार्या दुचाकीला सामोरासमोर धडक दिल्याने दुचाकीस्वार दोन्ही युवक जागीच ठार झाले आहे. सदर अपघाताची माहिती आर्णी पोलिसांना मिळताच आर्णी पोलिसांनी घटना स्थळ गाठुन पंचनामा केला व शव विच्छेदना साठी पाठविले. तसेच आर्णी ग्रामीण रुग्णालया समोर बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

Leave a Reply