राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘वेब नागपूर’ वेबसाईट लाँच

नागपूर : १३ ऑक्टोबर – इंटरनेट सर्वसानान्यांच्या जीवनात गरजेची बाब बनली आहे. मग ते बिल भरायचं असोत की टॅक्स किंवा तिकीट काढणे, सर्वसामान्यांच्या अशा विविध गरजा एका क्लिकवर सोडवता याव्यात, म्हणून सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी ‘वेब नागपूर’ ही वेबसाईट तयार केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या ‘वेब नागपूर’ या वेबसाईटचं लाँचिंग केलं. यावेळी राज्यपाल यांनी समाजहितासाठी सुरु केलेल्या या निःशुल्क वेबसाईटला शुभेच्छा दिल्या आणि अजित पारसे यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं.
नुकतंच 2 ते 18 वयोगटासाठी ‘कोव्हॅक्सिन’च या कोरोना लसीच्या आपात्कालीन वापराला ‘डीजीसीआय’ने मंजुरी दिलीय. त्यामुळे लवकरच लहान मुलांचं लसीकरण सुरु होणार आहे. नागपूर जिल्ह्यात लहान मुलांना लस कशी मिळेल? नोंदणी कुठे करायची, लसीकरण केंद्र कुठले आणि प्रशासनाचं आवाहन, याबाबतची सर्व माहिती ‘वेब नागपूर’ या वेबसाईटवर देण्यात येणार आहे.
“भारतात ७४ कोटींच्या वर लोकं इंटरनेटचा वापर करतात, महाराष्ट्र आणि आपल्या नागपूरातंही ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक इंटरनेट वापरतात. त्यामुळे इंटरनेटच्या या जगात सर्वसामान्यांच्या रोजच्या गरजा ॲानलाईन सोडवता याव्यात, यात लाईट बिल भरणे, कर भरणे, तक्रार करणे, तिकीट काढणे, गॅस सिलिंडर बुक करणे यासारख्या गरजा एका क्लिकवर सोडवता याव्यात, म्हणुन ‘वेब नागपूर’ ही वेबसाईट नागपूरकरांच्या सेवेत लाँच केलीय.
प्रत्येक नागपूरकरांनी आपल्या रोजच्या गरजांसाठी वापरता येणारी ही निःशुल्क वेबसाईट आहे. आज राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी ही वेबसाईट लाँच केल्याने, त्यांचे मी आभार मानतो” अशी भावना यावेळी सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी व्यक्त केली. सर्वसामान्य नागपूरकरांना वेबसाईट वापरण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार असून, ‘वेब नागपूर’ नावाचं कार्डंही देण्यात येणार आहे. असंही अजित पारसे यांनी सांगितलं.
केंद्र आणि राज्य सरकार सघ्या ॲानलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे. नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि इतर सरकारी कार्यालयाने आपल्या बऱ्याच सेवा ॲानलाईन केल्या आहेत. पण बरेच लोक माहिती अभावी याचा लाभ घेत नाही. त्यामुळेच तळागळाळातल्या लोकांना ऑनलाई व्यवहार कळावे, रोजच्या जीवनात आपल्या गरजांसाठी इंटरनेटचा सहज वापर करता यावा, यासोबतच सर्वसामान्य नागपूरकरांनी ऑनलाईन सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, यासाठी ही वेबसाईट फायद्याची ठरेल असा विश्वास, त्यांनी केला जातो आहे.

Leave a Reply