पंतप्रधानांनी केला पीएम गती शक्ती या राष्ट्रीय योजनेचा शुभारंभ

नवी दिल्ली : १३ ऑक्टोबर – पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागांना एकत्र आणणाऱ्या पीएम गती शक्ती या राष्ट्रीय योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजधानीत प्रगती मैदानावर केला. यानिमित्ताने पायाभूत सुविधांशी संबंधित खात्याचे मंत्री नितिन गडकरी, पियूष गोयल, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे असे विविध मंत्री उपस्थित होते. केंद्रातर्फे देशात विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरु असतात. मात्र अनेकदा या संबंधित खात्यांमध्ये ताळमेळ नसल्याने प्रकल्पांना उशीर होतो, प्रकल्प रखडतात, प्रकल्पांची किंमत वाढते. तेव्हा अशा पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमध्ये समन्वय रहावा यासाठी संबधित खात्यांना एकत्र आणण्यासाठी पीएम गती शक्ती सुविधेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
या सुविधेनुसार तंत्रज्ञानाचा वापर करत १६ विविध विभाग – खाती हे एकाच व्यासपीठावर येतील. कुठल्याही प्रकल्पाच्या कामांची माहिती ही सर्व विभागांना मिळेल. यामुळे पुढील समनव्य साधणे, प्रकल्पातील अडचणी सोडवणे, प्रकल्प वेगाने पुर्ण करणे, प्रकल्पाचा अतिरिक्त खर्च वाचवणे हे शक्य होणार आहे. देशात पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे लवकर पुर्ण होतील, यामुळे लॉजिस्टीक कॉस्ट कमी होत उद्योगांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

Leave a Reply