येत्या दोन दिवसात राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याबाबत होणार निर्णय – उदय सामंत

मुंबई : १२ ऑक्टोबर – महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणताही जीआर किंवा अध्यादेश काढलेला नाही. मात्र, येत्या दोन दिवसात राज्यातील महाविद्यालय सुरू होण्याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी रत्नागिरीत दिली आहे.
पुण्यात काही ठिकाणी स्वायत्त कॉलेज सुरू झाल्याची बातमी कानावर येत आहे. मी स्वतः सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या काही अधिकाऱ्यांशी बोललो आहे. माझ्या विभागातील संचालकांशी बोललो आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणताही जीआर किंवा अध्यादेश काढलेला नाही. पण मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार बुधवार किंवा गुरूवारी या दोन दिवसांच्या आत कॉलेज सुरू करण्याबाबत तारीख जाहीर केली जाईल, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply