वर्हाडी ठेचा ….

धन्य हे आघाडी सरकार ….

( चाल — रम्य ही स्वर्गाहुन लंका )

धन्य हे आघाडी सरकार !
धन्य हे आघाडी सरकार !
सरकारही ह्या कसे म्हणावे ?
मज गमते भंगार ! ।।

साधुजनांना जिवे मारती !
सज्जन त्राही त्राही करिती !
जेथ खंडणी मंत्री उगवती !
पोलीस ठग बनणार ! ।। धन्य हे …

महामारीने त्रस्त ही जनता
नाही सुरक्षित कुणीही वनिता
रक्षक भक्षक होति तेधवा
कुणाकडे जाणार ? ।। धन्य हे….

हिरव्यांसाठी हे नन्दनवन !
भगव्यांचे हे काळकर्दन !
सरड्यावाणी नित्य धारिती
नवे नवे अवतार ! ।। धन्य हे …

एक दुज्याचे पाय ओढिती
साप मुंगुसापरी भांडिती
कबर आपली अपुल्या हस्ते
स्वयेच ते खणणार ! ।। धन्य हे ..

विडंबनकार — कवी अनिल शेंडे।

Leave a Reply