वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

तरुण पप्पू– म्हातारे ढप्पू !

पोरकटपणावर पप्पू टाईपच्या प्रौढ बालकांचाच एकाधिकार आहे असं नाही !
ऐंशी प्लसचे म्हातारे आणि राजकारणात पन्नास पन्नास वर्ष मुरलेले भोजे सुद्धा यात मागे नाही !
काल एक पावरबाज एव्हरग्रीन भावीपंत बोलून गेले —
मी शेतकरी आंदोलनाचं काल समर्थन केलं , म्हणून ,
आज माझ्या नातेवाईकांवर इन्कमटॅक्सचं धाडसत्र सुरू झालं !
त्यांची ही थपेबाजी त्यांच्या चेलेचपाट्यांपुढे खपली
पण छोटीछोटी बाळंसुद्धा हे ऐकून हंसली !
इन्कमटॅक्सची धाड टाकण्यापुर्वी ती मंडळी किमान तीनचार महिने त्या करचोराचा अभ्यास करतात
त्याच्याविरुद्धची प्राथमिक माहिती गोळा करतात , आणि
खात्री पटल्यानंतरच धाड मारतात
हे आजकाल शाळकरी मुलांनाही कळते !
तसं ते यांनाही कळते , पण ,
जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी हे शकुनीपुत्र नाना क्लृप्त्या वापरून पहातात !
कुठे एखादी हिंसक घटना झाली तर त्याची तुलना ते जालियनवाला बागेशी करतात !
आणि स्वतः सत्ताधीश असताना घडलेले मावळ , गोवारी, पालघर मात्र विसरतात !
जनतेला यांचे कावे आता चांगलेच कळले आहेत
आणि म्हणूनच आज हे राजकारणात
तृतीयस्थानी आहेत !

      कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply