वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

जेव्हा मच्छराला ताप चढतो !

काल एका मच्छराला
चढला एकदम ताप !
मच्छरीण म्हणाली ,
केव्हढं हे टेम्प्रेचर ! बाप रे बाप !

मच्छर म्हणाला ,
काल माझ्या लक्षातच नाही आलं
माणूस समजून मी एका
कँपौंडर छाप नेत्याचं रक्त प्यायलं !

मच्छरीण म्हणाली, ” आव मा..य !
आता काही खरं नाही तुमचं !
कारण, या टाईपच्या इन्फेक्शनवर
औषध नाही कोणचं !

पण एक इलाज आठवतो
तेव्हढा करून पहा
विष विषाला मारते म्हणतात !
तुम्ही त्याच्या डॉक्टरछाप
बॉसला चावून पहा !!

     कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply