पतीच्या आत्महत्येनंतर पोटच्या मुलीची हत्या करून महिलेने केली आत्महत्या

वर्धा : १ ऑक्टोबर – पोटच्या मुलीची निर्दयपणे हत्या करून आईने स्वतःही गळफास लावून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला आहे. ही घटना आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास संत तुकडोजी वॉर्डातील आशिष नगर येथे घडली. कविता नरेंद्र मोहदुरे वय २५ आणि आराध्या (वय ३) हे मृत्यू पावलेल्या आई मुलीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, कविता नरेंद्र मोहदुरेे ही गणेश नगर, वर्धा येथे राहणारी असून आठ दिवसांपूर्वी तिच्या पतीने आत्महत्या केल्याने ती आपली आई मंदाबाई मनोज शेळके यांच्या सोबत मुलीला घेऊन हिंगणघाट येथे राहत होती. दरम्यान आज मंदाबाई शेळके या बँकेत कामानिमित्त गेल्या होत्या. त्या परत आल्या असता त्यांना कविता गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली तर तिची चिमुरडी मुलगीही मृतावस्थेत आढळून आली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे.

Leave a Reply