लंबकर्ण कर्णधार झाले राज्याचे
हाय ! हाय ! कस्से होणार माझ्या राज्याचे ।।
तीन बंदरासमान वागतात ते
ऐकती न पाहती न बोलतीही ते
कळसुत्री बाहुलीच वाटतात ते
प्याद्यालाच नाव मिळे मुख्यमंत्री हे
हाय! हाय ! कस्से होणार माझ्या राज्याचे ।।
कर्णधार नामधारी फक्त असे ते
सेनापती असुनही पतीच भासी ते
तो पहा ! खुर्चीसाठी रंग बदलतो
गर्दभास भाव आले ऐरावताचे ।।
हाय !हाय !कस्से होणार माझ्या राज्याचे ।।
कोणी असे नॉटी आणि कोणी टगे हो
कोटीकोटी गट्ट करिती निगरगट्ट हो
मंत्री तो फरार दुजा इस्पितळी हो
इस्पितळा रूप देती पंचतारीचे ।।
हाय ! हाय ! कस्से होणार माझ्या राज्याचे ।।
कवी -- अनिल शेंडे.