मोबाईलवर गेम खेळण्यासाठी रागावले म्हणून १६ वर्षीय मुलाने केली आत्महत्या

बुलडाणा : ३० सप्टेंबर – लहान मुलांमध्ये सध्या मोबाईलचा क्रेझ खूपच वाढला आहे. त्यात आता ऑनलाईन शिक्षणामुळे यामध्ये आणखी भर पडली आहे. मोबाईलच्या अती वापरामुळे सध्याची तरुणाई एका वेगळ्याच विश्वात वावरत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात हत्या, आत्महत्या, अत्याचार अशा घटना समोर येत आहेत. बुलढाण्यामध्येही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईलवरून हटकल्याने मुलाने थेट आत्महत्येचा मार्ग निवडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईलमध्ये गेम खेळू नको म्हणून हटकल्याने एका १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुलडाण्याच्या खामगाव येथे उघडकीस आली आहे. राहुल संदीप राऊत असं या १६ वर्षीय आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
दोन वर्षापासून करोना महामारीमुळे शाळा महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक सत्र हे ऑनलाइन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन दिले. मात्र, या शिक्षणासोबतच मुलं ऑनलाइन गेमच्यासुद्धा आहारी जात असल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील राहुल संदीप राऊत याला त्याच्या पालकांनी मोबाईल मध्ये गेम खेळू नको म्हणून हटकले होते.त्यानंतर च्या सायंकाळी तो रागाच्या भरात घरातून निघून गेला त्याच्या शोधाशोध घेतला असता तो सापडला नसल्याने त्याची तक्रार खामगाव पोलिसांत दिली दुसऱ्या दिवशी सकाळी घराशेजारी असलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या नादात मुलं मोबाईल गेमच्या आहारी जात असल्याचं पुन्हा एकदा धक्कादायक वास्तव समोर आल आहे.

Leave a Reply