ड्रोनच्या मदतीने पंचनामे करून सात दिवसात शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजाराची मदत करावी – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : २९ सप्टेंबर – गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीने मराठवाडा – विदर्भात पिकांचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीन आणि कापसाचं हातातोंडाशी आलेलं पीक हातचं गेलंय. त्यामुळे राज्य सरकारने तीन दिवसांत पीक नुकसानीचे पंचानामे करावे, जिथे पुरामुळे प्रत्यक्ष जाऊन पंचनामे शक्य नाही, तिथे ड्रोनच्या मदतीनं पंचनामे करावे आणि सात दिवसांत हेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.
मागच्या दोन महिन्यांचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पुरामुळं जीवितहानी आणि वित्तहानी झाली. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे झाले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी हेक्टरी २५ हजार द्यावी असल्याचं म्हटलं होतं. शेतकऱ्यांना येत्या ७ दिवसात तातडीनं मदत द्यावी, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. आमची मागणी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मिळावी अशी आहे मात्र सरकारनं किमान २५ हजार रुपये शेतकऱ्यांना येत्या सात दिवसात द्यावेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

Leave a Reply