ओबीसींना वगळून भारताचा विकास होणे शक्य नाही – प्रा. हरी नरके

यवतमाळ : २८ सप्टेंबर – भारतावर प्रेम असेल तर ओबीसीसाठी तुम्ही असाल त्या क्षेत्रात जागृतीचे काम करा, कारण भारतातला प्रत्येक दोन माणसातला एकजण ओबीसी आहे. त्याला वगळून भारताचा विकास शक्य नाही. तेव्हा ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत तथा साहित्यिक प्रा. हरी नरके व्यक्त केले. ते दारव्हा येथे समता परिषदेच्या वतीने आयोजित प्रबोधन शिबिरात बोलत होते.
तर ज्येष्ठ संपादक तथा साहित्यिक उत्तम कांबळे यांनी इतिहासातील दाखले देत बहुजनांची परिस्थिती समजून सांगताना आकडेवारी नाही म्हणून आरक्षण नाही. तेव्हा जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी विविध दाखले देत ओबीसींची वर्षानुवर्षे कशी पिळवणूक होत आहे, हे निदर्शनास आणून दिले. सर्वांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, अशी आग‘ही भूमिका मांडली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे दारव्हा येथे कार्यकर्ता प्रबोधन शिबिर झाले. कार्यक‘माचे अध्यक्ष समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ होते. प्रमुख अतिथी प्रदेश सरचिटणीस रवी सोनवणे, विदर्भ अध्यक्ष प्रा. अरविंद गाभणे, गजानन इंगळे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष दत्ता खरात, सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकरे, डॉ. वसंत उमाळे, अॅतड. राजेश चौधरी, नगरसेवक रवी तरटे उपस्थित होते. जिल्ह्यातील समता सैनिक व नागरिकांनी मोठ्या सं‘येने उपस्थिती होती. प्रास्ताविक आत्माराम जाधव, संचालन गणेश राऊत व आभार राजेंद्र घाटे यांनी मानले.

Leave a Reply