वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

हिंदुत्वाचे खच्चीकरण !

काही पिग्मी वाममार्गी हिंदुत्वाच्या नायनाटाची स्वप्ने पहात आहेत !
त्यासाठी ते मोठमोठ्या ग्लोबल परिषदा भरवत आहेत !
अरे मूर्ख दिवाभितांनो, हिंदुत्वाच्या उच्चाटनाच्या बाता करणं म्हणजे काजव्याने सूर्याला गिळण्याच्या वल्गना करण्यासारखं आहे !
कारण, हिंदुत्व म्हणजे कोणत्या पंथोपपंथात अडकलेला आणि एका विशिष्ट मानवी टोळीच्या भल्यासाठी निर्माण झालेला तकलादू विचार नाही ! तर ,
मानवासहित समस्त प्राणिमात्र आणि चलअचल सृष्टीच्याही योगक्षेमाची काळजी घेणारं एक उदात्त सर्वसमावेशक तत्वज्ञान आहे !
सर्वांभूती परमेश्वर पाहणारा पृथ्वीच्या पाठीवरील एकमेव धर्म आहे !
अखिल विश्वाला संस्कृत सारखी सर्वश्रेष्ठ भाषा, वेद उपनिषदांचं श्रेष्ठ तत्वज्ञान , रामायण, महाभारतासारखी सर्वश्रेष्ठ महाकाव्ये देणाऱ्या संस्कृतीचं नाव आहे हिंदुत्व !
खगोलशास्त्र, स्थापत्यशास्त्र,गणित, औषधीशास्त्र,आदी सर्व शास्त्रांची गंगोत्री म्हणजे हिंदुत्व !
गायननृत्य,नाट्य,चित्रकला,शिल्पकला
आदी सर्व कलांचे माहेर आहे हिंदुत्व!
रामाचा त्याग,कृष्णाचा कर्मयोग,महावीर, बुद्धाची, संतांची करुणा म्हणजे हिंदुत्व !
विक्रमाचा , शालिवाहनाचा , छत्रपतींचा पराक्रम म्हणजे हिंदुत्व !
सर्वात प्राचीन असूनही नित्यनूतन असणाऱ्या , वसुधेलाच आपलं कुटुंब मानणाऱ्या , विश्वगुरूच्या स्थानी शोभणाऱ्या सभ्यतेचं नाव म्हणजे हिंदुत्व !
हे हिंदुत्व अनादी अनंत आहे ! अविनाशी आहे !
हिंदुत्व हे मानव जातीला पडलेलं सर्वश्रेष्ठ आणि सर्वांगसुंदर स्वप्न आहे !
हिंदुत्वाच्या रक्षणातच मानवजातीचं आणि पृथ्वीचंही कल्याण आहे !
हे या तमाम वाममार्गीनी लक्षात घेणे जगाच्याआणि त्यांच्याही हिताचं आहे!

             कवी -- अनिल शेंडे।

Leave a Reply